Gautami Patil: पुण्यातील अपघातप्रकरणी गौतमी पाटीलवर कारवाई होणार नाही! पुणे पोलिसांनी केलं स्पष्ट

Gautami Patil Pune Accident Case: पुण्यातल्या कार अपघातामुळं चर्चेत आलेली आणि राजकारणाचा निशाणा ठरलेली प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर कारवाईसाठी भाजप आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावला होता.
Gautami Patil_Sambhaji Kadam
Gautami Patil_Sambhaji Kadam
Published on
Updated on

Gautami Patil Pune Accident Case: पुण्यातल्या कार अपघातामुळं चर्चेत आलेली आणि राजकारणाचा निशाणा ठरलेली प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर कारवाईसाठी भाजप आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपींना फोन लावला होता. पण आता गौतमीवर या प्रकरणात कारवाई करता येणार नाही असं स्पष्टीकरण डीसीपी संभाजी कदम यांनी दिलं आहे. याबाबत कायदा काय सांगतो हे देखील त्यांनी सांगितलं आहे.

Gautami Patil_Sambhaji Kadam
Top 10 News: रायगडमधील संघर्षात नवा ट्विस्ट! कार्यकर्ते हमरी-तुमरीवर ते 'मिस्टर इंडिया' झालेल्या धंगेकरांची अखेर गौतमी पाटील प्रकरणात 'एन्ट्री'

गौतमी कारवाई करता येणार नाही - पोलीस

डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितलं की, "मोटार व्हेईकल कायद्यानुसार, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या गाडीत बसलेल्या को-पॅसेंजरवर कारवाई करता येत नाही. कायद्यात केवळ चालक अपघाताला जबाबदार असल्यानं त्याच्यावर कारवाईची तरतूद आहे. त्यामुळं गौतमी पाटीलवर कुठलीही कारवाई करता येणार नाही. अपघातावेळी गौतमी पाटील गाडीत होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याबाबतचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे. पण गौतमीनं गाडीची सर्व कागदपत्रे पोलिसांकडं जमा केली आहेत. तसंच गरज पडल्यास तिला चौकशीसाठी बोलावलं जाईल. पण अद्याप तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं नाही"

Gautami Patil_Sambhaji Kadam
PMC Election 2025: पुणे महापालिकेत 'मत चोरी' रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन; बूथ प्रमुखांना दिल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

रिक्षा चालकाच्या कुटुंबियांचा आरोप

दरम्यान, अपघातात नुकसान झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी अपघातावेळी गाडीत गौतमी पाटील असण्याची केवळ शक्यता व्यक्त केली आहे. अपघातावेळी ते घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळं पोलिसांनी रिक्षाचालक समाजी मरगळे यांच्या कुटुंबियांची गौतमी पाटीलवर कारवाईची मागणी फेटाळून लावली. तसंच कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील फोन करुन डीसीपींना गौतमी पाटीलला उचलणार आहात की नाही? अशा भाषेत आदेश दिले होते. पण कायद्यात हे बसत नसल्यानं पोलिसांनी त्यांच्या आदेशवजा सूचनेला बाजुला ठेवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com