Dhananjay Munde : "शेतकऱ्यांना कितीही दिलं तरी ते कमीच असतं; कारण..." धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Dhananjay Munde On Farmer issue : "राज्यात पाऊस कमी किंवा जास्त पडला तरी आणि विमा किंवा अनुदान उशीरा मिळालं तरी शिव्या या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात. त्यामुळं मला रोज रात्री उचक्या येतात."
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 Sep : राज्यात पाऊस कमी किंवा जास्त पडला तरी आणि विमा किंवा अनुदान उशीरा मिळालं तरी शिव्या या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात. त्यामुळं मला रोज रात्री उचक्या येतात, असं वक्तव्यं राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केलं आहे.

ते पुण्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. मागील काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झालं आहे. ज्या भागात नुकसान झालं आहे तिथे पंचनामे करण्याचे आदेशही मुंडे यांनी दिले आहेत.

शिवाय पंचनामे झाल्यानंतर आर्थिक मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. अशातच आता मुंडे यांनी त्यांच्याकडील कृषी खातं साधंसुधं नसल्याचं सांगत मला अनेकांच्या शिव्या खाव्या लागतात असं म्हटलं आहे. "कृषी खातं हे साधंसुधं नाही, चांगलं झालं तर लोक साधं कौतुकही करत नाहीत. पण वाईट झालं की शिव्यांची लाखोली वाहतात", असं मंत्री मुंडे (Dhananjay Munde) म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Dhananjay Munde
Amit Shah : अजितदादांची महायुतीतून 'एक्झिट'? अमित शहांनी खरे काय ते सांगूनच टाकलं...

दरम्यान, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना (Farmer) कितीही दिलं तरी ते कमीचं असतं, कारण तो निसर्गाशी लढतो, उघड्या आभाळाखाली आपली शेती करतो, असंही मुंडे म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी काहीही झालं तरी कृषी मंत्र्यालाच शिव्या खाव्या लागतात असंही सांगितलं. ते म्हणाले, "तुम्ही कशाला कृषी मंत्री झालात? असं मला इन्शुरन्स कंपन्या विचारतात. शेतकऱ्यांना कितीही दिलं तरी ते कमीचं आहे. कारण तो निसर्गाशी लढतो उघड्या आभाळाखाली आपली शेती करतो.

आता विरोधक म्हणतात की सरकारला लाडक्या बहीणींशिवाय काही दिसत नाही. पण सगळ्यात आधी शेतकरी या सरकारचा लाडका आहे, म्हणूनच शेतकर्‍यांसाठीही योजना आणल्या जात आहेत. आता आपण पुन्हा सत्तेत येणार हे निर्विवाद सत्य आहे. लाडकी बहीण, लाडका शेतकरी आमच्यासोबतच आहेत.

Dhananjay Munde
Sachin Sawant on Fadnavis : 'गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून 'मिर्झापूर'मधील अखंडानंद..' ; सचिन सावंतांनी लगावला टोला!

पण सत्ता आल्यानंतर पुन्हा हाच विभाग माझ्याकडे राहावा यासाठी आमदार दिलीप मोहितेंनी पाठपुरावा असंह ते यावेळी म्हणाले. तसंच पाऊस कमी पडला शिव्या कृषीमंत्र्याला, पाऊस जास्त पडला तरी शिव्या कृषीमंत्र्याला विमा, अनुदान उशीरा मिळालं तरीही शिव्या कृषीमंत्र्यालाच खाव्या लागतात. त्यामुळं मला रोज रात्री उचक्या येतात, अशी मिश्किल टिप्पणी मुंडेंनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com