Sachin Sawant on Fadnavis : 'गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून 'मिर्झापूर'मधील अखंडानंद..' ; सचिन सावंतांनी लगावला टोला!

Sachin Sawant on Akshay Shinde Encounter : भाजपाने राजकारण, प्रशासनाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर आणला आहे. हे सर्व प्रचंड अस्वस्थ करणारे आणि दुर्दैवी आहे. असंही सावंत म्हणाले आहेत.
Sachin Sawant
Sachin SawantSarkarnama
Published on
Updated on

Sachin Sawant News : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं. या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बदलापूरात तर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सवही साजरा केला गेला. तर अनेकांनी 'बदला पूरा' असं म्हणत सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. एवढंच नाहीतर एकेठिकाणी चक्क गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पिस्तूल दाखवून 'बदला पूरा' असा मजकूर असणारे बॅनरही लावलं गेलं. यावरून आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सचिन सावंत यांनी गृहमंत्री फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हाती बंदूक असलेल्या फोटोचं हे बॅनर त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सवला केला की, 'सरकार आहे का "गँग्ज ऑफ वासेपूर " त्यातही गृहमंत्र्यांच्या हातात बंदूक पाहून मिर्झापूर सिरीज मधील अखंडानंद त्रिपाठीची आठवण येत आहे.

Sachin Sawant
Akshay Shinde Encounter Case Update: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर 'फेक'? वडिलांनी उचललं मोठं पाऊल

तसेच, 'पदाची प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे भान, गांभीर्य सर्व नष्ट झाले आहे. भाजपाने राजकारण, प्रशासनाचा स्तर अत्यंत खालच्या पातळीवर आणला गेला आहे. हे सर्व प्रचंड अस्वस्थ करणारे आणि दुर्दैवी आहे.‌ पुढच्या पिढ्यांना काय आदर्श देणार व कोणत्या स्वरूपात महाराष्ट्र सुपुर्द करणार? हा प्रश्न आहे.' अशा शब्दांत सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Sachin Sawant
Amit Thackeray : ''...तेव्हाच खऱ्या अर्थाने पीडित मुलींचा ‘बदला... पुरा’ होईल'' ; अक्षय शिंदे एन्काऊंटरवर अमित ठाकरेंचं विधान!

दरम्यान, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित करत, पोलिस प्रशासनासह सरकारला टीकेचं लक्ष्य केलं आहे. शिवाय या प्रकरणाचा सीआयडीकडूनही तपास सुरू आहे. तर अक्षय शिंदेच्या वडिलांनी या प्रकरणातील उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अक्षय शिंदेचा(Akshay Shinde) शवविच्छेदन अहवालही समोर आला असून, डोक्यात गोळी लागून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अक्षयचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पाच डॉक्टरांच्यी टीमने जवळपास सात सात शवविच्छेदन केलं आणि या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आलं आहे. विरोधकांकडून आरोप केला गेला आहे की, अक्षय शिंदेला षडयंत्र रचून ठार केलं गेलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com