Ajit Pawar NCP : सगळ्यांनाच आमदार व्हायचंय; पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांना शहराध्यक्ष मिळेना..!

Pimpri Chinchwad Ajit Pawar NCP : दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला कुठूनतरी उमेदवारी मिळण्याची आशा आहे. त्यामुळे चर्चेत असणारी मंडळी शहराध्यक्ष पदापासून सध्या तरी दूर राहणेच पसंत करत असल्याचे चित्र आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Political News : पिंपरी - चिंचवड हे शहर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र आमदरकीसाठी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी शरद पवार गटात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला आहे.

त्यांच्यानंतर मात्र अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे शहराध्यक्षपद अद्यापही रिक्त आहे. त्यामुळे या पदावर आता कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

आता विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असून लवकरच आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. मात्र अजित गव्हाणे सोडून गेल्यापासून अजित पवार गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष पदाचा तिढा सोडवता आलेला नाही.

दरम्यान, या पदासाठी दावेदार आणि अजितदादांना विश्वास असणाऱ्या नेत्यांना आता आमदारकीचे वेध लागल्याचे दिसून येत आहे. परिणामी ऐन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष कुणाची नियुक्ती करायची, असा प्रश्न पक्षापुढे आहे.

ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित गव्हाणे Ajit Gavhane यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने पिंपरी-चिंचवडच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा पार पडला. त्यानंतर पक्षाची आणखी पडझड टाळण्यासाठी अजित पवार यांनी तत्काळ पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. तसेच कार्यकर्ता मेळावाही घेतला. त्याचवेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांची नावे आल्याचेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आठवडा उलटूनही अद्याप हे पद रिक्तच आहे.

Ajit Pawar
Marathwada Politics : महाराष्ट्राच्या सत्तेची वाट मराठवाड्यातून; असं असणार विधानसभेचं गणित...

अजित पवार Ajit Pawar गटातील आमदार अण्णा बनसोडे, जगदीश शेट्टी, माजी महापौर योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, श्याम लांडे आदी नावांची चर्चा शहराध्यक्षपदासाठी आहे. मात्र या सर्वांनाच आमदार व्हायचे आहे.

बनसोडे यांची पिंपरीतून उमेदवारी फिक्स मानली जात आहे. तर योगेश बहल यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीवर डोळा आहे. तसेच नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर हे चिंचवडमधून विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत.

दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला कुठूनतरी उमेदवारी मिळण्याची आशा आहे. त्यामुळे चर्चेत असणारी मंडळी शहराध्यक्ष पदापासून सध्या तरी दूर राहणेच पसंत करत असल्याचे चित्र आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पिंपरी - चिंचवड शहरासाठी कुणाला पसंती देतात याकडे लक्ष आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : 'विकास वृत्ती' विरुद्ध 'वसुली बुध्दी' फडणवीस-देशमुखांच्यातील वाद पोहोचला बॅनरपर्यंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com