Congress Criticize to KCR : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सिंघम नव्हे ते तर जयकांत शिक्रे; काँग्रेस प्रवक्त्याची बोचरी टीका!

Congress Criticize to KCR : या भ्रमातून चंद्रशेखर राव यांनी लवकरात लवकर बाहेर पडावं...
Congress Criticize to KCR :
Congress Criticize to KCR : Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : तेलंगणानंतर महाराष्ट्रात आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या तेलंगणचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समिती (BRS) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज ते पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेणार आहेत. आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह ते दर्शन घेणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचा संपूर्ण ताफा महाराष्ट्रात दाखल झाला. सिंघम स्टाईल त्यांनी महाराष्ट्रात एन्ट्री घेतली, अशी चर्चा होत होती. याच पार्श्वभूमीवर आता आता काँग्रेसने राव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Congress Criticize to KCR :
K. Chandrasekhar Rao News : के. चंद्रशेखर रावांचा धडाका; कुणाला देणार दणका; प्रमुख पक्षांची चिंता वाढली...

महाराष्ट्र काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार (Hanumant Pawar) यांनी चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "स्वतःच्या राज्यातील जनतेला फसवून अपप्रचार करत, सत्तेतला भ्रष्टाचार लपवत आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांची सुपारी घेवून तेलंगानातून महाराष्ट्रात घुसू पाहणाऱ्या जयकांत शिक्रेला महाविकास आघाडीचे गांव पातळीवरचे बाजीराव सिंघम रुपी सामान्य कार्यकर्ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत," असे हनुमंत पवार यांनी हल्लाबोल केला.

Congress Criticize to KCR :
KCR On Maharashtra Tour : पुष्पवृष्टीची परवानगी नाकारली; 'केसीआर' एकटेच घेणार दर्शन, 'असा' असणार दिनक्रम

"बीआरएसचा एक माजी खासदार, 12 माजी मंत्री आणि 35 राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या भ्रष्ट कारभाराला वैतागून काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, स्वतःचं राज्य आणि पक्ष सांभाळता न येणाऱ्या केसीआर यांनी महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षासाठी कामं करण्याचं बंद करावं. लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात लढायची भाषा करणाऱ्या केसीआर यांना केंद्र सरकारच्या भूमी अधिग्रहण, वादग्रस्त तिनं कृषि विधेयक, अन्यायकारक जीएसटी, फसलेली नोटबंदी, कचखाऊ परराष्ट्र धोरण, धार्मिक असहिष्णूता, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर, संसदीय परंपरांची मोडतोड आणि जनविरोधी आर्थिक धोरणावर मागील 9 वर्षात काय भूमिका घेतली हें अगोदर स्पष्ट करावे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि अल्पसंख्यांक समुदायवरील वाढत्या हल्ल्या संदर्भात केसीआर यांनी कधी आवाज उठवल्याचे उदाहरण आहे का?" असे प्रश्नही पवार यांनी उपस्थित केले.

ठमहाराष्ट्रातील रस्ते फ्लेक्सने रंगवून आणि चार चाकी गाड्यांची माळ रस्त्यावर उतरवून मराठी मतदारांची आपण दिशाभूल करू, असा यांचा विचार असेल तर या भ्रमातून चंद्रशेखर राव यांनी लवकरात लवकर बाहेर यावं," असेही पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com