K. Chandrasekhar Rao News : के. चंद्रशेखर रावांचा धडाका; कुणाला देणार दणका; प्रमुख पक्षांची चिंता वाढली...

K. Chandrasekhar Rao Maharashtra News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धीते आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा धडाका लावला आहे.
K. Chandrasekhar Rao
K. Chandrasekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

BRS Maharashtra News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना (शिंदे) गटाचेही टेन्शन वाढले आहे.

भारत राष्ट्र समितीचे पहिले कार्यालय नागपूरमध्ये झाले. नागपूरनंतर आता बीआरएसची राज्यभरात कार्यालये सुरु होणार आहेत. राज्यातील अनेक नेत्यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामाध्यमातून आपली पाळेमुळे घट्ट करण्यासाठी के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) यांनी आपली संपूर्ण ताकद महाराष्ट्रात लावली आहे. के. चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रातील दौरेही वाढू लागले आहेत.

K. Chandrasekhar Rao
KCR On Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंसाठी खास विमान का पाठविले होते?; केसीआर यांनी सांगितले कारण…

पक्षाच्या नागपूरमधील कार्यालयाचे उद्‌घाटन चंद्रशेखर राव यांच्या हस्ते झाले. नांदेड, सोलापूर, सांगली, संभाजीनगर या ठिकाणी पक्ष वाढीवर भर देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमधील (BJP) काही मंडळींनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. चंद्रशेखर राव यांची पहिला सभा नांदेडमध्ये झाली. त्यावेळी बीआरएसच्या विस्ताराची फारशी चर्चा नव्हती. मात्र, त्यानंतर त्यांनी इतर पक्षातील कार्यकर्त्यांना बीआरएसमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीचे अस्तित्व हळूहळू जाणवू लागले आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या जाहिराती आणि त्या माध्यमातून तेलंगणा सरकारने राबवलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचण्यात येत आहे. तर 'अबकी बार किसान सरकार' अशा टॅगलाईनने राज्यभरात मोठ-मोठ्या होडिंग्स लावल्या आहेत. या माध्यमातूनही बीआरएसचे काम लोकांपर्यंत पोहचवले जात आहे. महाराष्ट्रच्या सीमाभागत मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा के. चंद्रशेखर राव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांमध्ये विदर्भात तीन माजी आमदार पक्षाच्या गळाला लागले आहेत. त्यामध्ये चरण ठाकूर, माजी आमदार राजू तोडसाम आणि दीपक आत्राम यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. तसेच अहमदनगरचे राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनीही बीआरएसमध्ये प्रवेश केला. तर पंढरपूरचे भगिरत भालके यांच्यासाठी तेलंगणावरुन विशेष विमान पाठवले होते. यामुळे महाराष्ट्रात के. चंद्रशेखर राव यांनी धडाक्यात सुरुवात केली आहे.

K. Chandrasekhar Rao
Kolhapur Loksabha Election : अमित शहांनी आम्हाला शब्द दिलाय; कोल्हापुरातून मीच लढणार, संजय मंडलिकांनी रणशिंग फुंकले

के. चंद्रशेखर राव यांच्या सभांमुळे आणि आक्रमक रणनीतीमुळे राज्यातील काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवेसना (ठाकरे गट) यांच्यापुढे आव्हाण निर्माण झाले आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेला (शिंदे गट) काही प्रमाणात फटका बसू शकतो. त्यामुळे राज्यातील प्रस्थापीत पक्षांना आपली निवडणूक रणनीती बदलावी लागणार आहे. बीआसएसचा धडाका असाच सुरु राहिल्यास राज्यातील पक्षांसमोर नवे आव्हान तयार होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com