Rohit Pawar News : बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची नोटीस; रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar Baramati Agro Notice : "72 तासांत हा प्लांट बंद करण्यात यावा..."
Rohit Pawar News
Rohit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार रोहित पवार संचलित बारामती अॅग्रोच्या इंदापूर तालुक्यातील शेठफळ गढे येथील डिस्टलरी प्लांटला आज (28 सप्टेंबर) पहाटे 2 वाजता प्रदूषण महामंडळाकडून नोटीस बजावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. येत्या 72 तासांत हा प्लांट बंद करण्यात यावा, असे नोटिशीत महामंडळाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवारांनी ही कारवाई राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या इशाऱ्याने कुठला तरी द्वेष मनात ठेवून, आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका भागावर ही कारवाई करण्यात आली, असे रोहित पवार यांनी नोटीससंदर्भात सोशल मीडियातून सांगितले आहे.

Rohit Pawar News
Nagar MIDC News : रोहित पवारांच्या संकल्पनेतील 'एमआयडीसी' अवतरली गणेशोत्सवाच्या देखाव्यात...

रोहित पवार म्हणाले, "युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करताना, भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलत असतो, ठाम भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. पण अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते, ही मराठी माणसाची खासियत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Rohit Pawar News
NCP Mumbai President : मुंबईसाठी अजित पवार गटाने आखली रणनीती; समीर भुजबळांवर सोपवली मोठी जबाबदारी

"हा लढा मी लढणारच आहे. परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही, असेही रोहित पवार म्हणाले.

"आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सूडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे, असाही सूचक इशारा पवारांनी दिला.

Rohit Pawar News
Satara NCP News : अजितदादांनी दिली रामराजेंच्या बंधूंवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी....

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, "सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून, सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील," असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com