NCP-BJP Politics :
NCP-BJP Politics : Sarkarnama

Dilip Mohite-Patil News: 'आता लोकही आमच्याकडे संशयाने पाहायला लागलेत'; दिलीप मोहिते-पाटलांची माध्यमांना विनंती

NCP-BJP Politics: आज विचार केला तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मेजॉरिटी आहे.
Published on

Maharashtra Political News: ''माध्यमांनी फिरवलेल्या या बातम्यांमध्ये कोणतही तथ्य नाही. अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत. जर त्यांना काही करायचं असेल तर ते संपुर्ण महाराष्ट्राला सांगतात. या क्षणापर्यंत पुणे जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला, अशोक पवार, अतुल बेनके, मी, सुनील शेळके, सुनील टिंगरे, चेतन तुपे असतील आम्हाला कोणालाही या बद्दल कोणतीही कल्पना नाही.'' असे सांगत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबतत सुरु असलेल्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत. (Maharashtra Politics)

दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, '' काल दोन मुलाखती दाखवल्या गेल्या यात अण्ण बनसोडे आणि माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रीया दिल्या. त्यांनीच सांगितलं की आम्ही अजित पवार यांच्याोबत आहोत. अजित पवारांसह (Ajit Pawar) आम्ही सर्व मंडळी शरद पवारांच्या (Sharad Pawar) नेतृत्तवात काम करतो. आम्ही सगळेच पवारांच्या बरोबर आहोत.''

NCP-BJP Politics :
Dhananjay Munde News : ‘सगळं काही ठीक आहे, परफेक्टली वेल’ : अजितदादांना भेटलेल्या धनंजय मुंडेंचे सूचक विधान

आज विचार केला तर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मेजॉरिटी आहे.ज्यावेळी त्यांनी सभागृहात बहुमताची चाचणी घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे १६०-१७० आमदारांचे संख्याबळ होते.एवढे लोक त्यांच्यासोबत आहेत. उद्या जरी काही कारवाई झाली तर तरी त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. मग आज या सर्व चर्चा का चालल्या आहेत. त्याची आम्हाला काही माहिती नाही. असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच, माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी जी संभ्रमावस्था निर्माण केली आहे ती कृपा करुन करु नका, आता लोकही आमच्याकडे संशयाने पाहायला लागलेत. आम्हाला लोक फोन करायला लागलेत तुम्ही कोणाचे, पण मी सर्वांना एकच सांगतो मी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्तवात काम करतो. माझ्या राजकीय जीवनात जे काही मिळालं ते त्यांच्यामुळेच मिळालंंय. त्यामुळे मी शरद पवार आणि अजित पवारांबरोबरच आहे, एवढचं तुम्हाला सांगतो, असही मोहिते-पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com