Laxman Hake : मुख्यमंत्र्यांसोबतच्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीला न बोलावल्याने लक्ष्मण हाके नाराज, घेतला 'हा' मोठा निर्णय

OBC Leaders Meeting Mumbai : मुंबईमध्ये शनिवारी (ता.04) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत OBC नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली. मात्र, या बैठकीला आमंत्रण न दिल्यामुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके नाराज आहेत.
Laxman Hake
Laxman Hakesarkarnama
Published on
Updated on

Jejuri OBC Rally : मुंबईमध्ये शनिवारी (ता.04) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत OBC नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली.

मात्र, या बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्याने ओबीसी नेत्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे ते येत्या 10 ऑक्टॉबरला होणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या मोर्चावर ठाम आहेत. एकीकडे या बैठकीत ओबीसी नेत्यांचं समाधान झालं नसल्यामुळे ते नाराज आहेत.

तर दुसरीकडे या बैठकीला आमंत्रण न दिल्यामुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके नाराज आहेत. त्यामुळे आता नाराज हाकेंनी आता जेजुरीमधून आंदोलनाची हाक देण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा मेळावा जेजुरीत येथे होणार आहे.

Laxman Hake
Shivsena Politics : '...त्यामुळे रामदास कदम फर्स्टेट; मुलाच्या बारवरील रेड शिंदे थांबवू शकले असते पण..,' ठाकरेंच्या महिला नेत्याने सांगितलं इंटरनल पॉलिटिक्स

यासाठी ओबीसी समाज बांधवांना एकत्र येऊन आंदोलनाची तळी उचलण्याचं आवाहान केलं आहे. त्यामुळे आता हाकेंच्या आवाहनाला ओबीसी समाज किती प्रतिसाद देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ओबीसी नेत्यांच्या बैठकीवर मराठा समाजाच्या आंदोलानाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला आहे.

Laxman Hake
MVA Politics : महाविकास आघाडीत मनसेची एन्ट्री? शरद पवारांच्या पक्षाच्या मोठ्या नेत्याची घरी बैठक, नेमकं काय ठरलं!

जातीवादी लोकांचं ऐकू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. तर जीआर रद्द करण्याच्या मागणीवर ओबीसी नेते छगन भुजबळ ठाम आहेत. त्यामुळे आता फडणवीस सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे दोन्ही समाजातील लोकांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com