Rupali Chakankar News : रुपाली चाकणकर यांच्याविषयी सोशल मीडियावर अश्लील मजकूर; सात जणांवर गुन्हे दाखल

Rupali Chakankar News : या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
Rupali Chakankar News :
Rupali Chakankar News :Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित गट) नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याविरोधात समाज माध्यमांमध्ये (Social Media) अश्लील मजकूर प्रसिद्ध केला, तसेच चाकणकरांचे फोटो मॉर्फ (Photo Morph News) केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुण्यामध्ये सायबर क्राइम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Rupali Chakankar News :
Nashik Crime News: खूनाच्या खटल्यात भाजपच्या दोन नेत्यांना जन्मठेप!

रूपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. नुकतीच चाकणकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) महिला आघाडी प्रदेशाध्यक्षपदावर त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. दरम्यान चाकणकर यांच्याबद्दल समाज माध्यमांमध्ये अश्लील आशयाचे मजकूर काही जणांकडून प्रसिद्ध करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. याबाबत सायबर क्राइम अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ॲड. विजयकुमार साखरे या नावाने समाज माध्यमावर एक खाते आहे. या खातेधारकाचे केलेल्या पोस्ट वर आणखी काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rupali Chakankar News :
Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray : फडणवीसांवर टीका, विखे-पाटलांचा ठाकरेंवर पलटवार; सत्ता आणि...

सदर बाब रूपाली चाकणकर यांच्या लक्षात लक्षात आल्यावर, त्यांनी तातडीने सायबर पोलीसकडे धाव घेतली आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com