Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray : फडणवीसांवर टीका, विखे-पाटलांचा ठाकरेंवर पलटवार; सत्ता आणि...

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहेत, अशी टीका केली होती.
Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray :
Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray :Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Politics : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आपल्या विदर्भ दौऱ्यात नागपूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात नागपूरला लागलेला कलंक असा उल्लेख करत कडवट टिप्पणी केली. ठाकरेंची ही कडवट टिपण्णी भाजपाला मोठी भावनिक जखम करणारी असून त्याचे तीव्र पडसाद राज्यभर सध्या दिसून येत आहेत.

ठाकरेंच्या फडनवीसांच्या संदर्भातील जहरी टिपण्णीवर राज्यातील भाजपचे नेते पक्ष पातळीवर आंदोलने करत ठाकरेंना लक्ष करत आहेत. ठाकरेंनी टिपण्णीत वापरलेला 'कलंक' ह्याच शब्दाचा आधार घेत नितीन गडकरी, बावनकुळे आदी नेत्यांनी प्रत्युत्तर दिले जात आहे.

Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray :
Praja Foundation Report : भाजपची कामगिरी घसरली..; शिंदे, ठाकरे गटातील आमदारांचे प्रगती पुस्तक हाती

याच अनुषंगाने आता भाजप नेते आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर'कलंक' शब्दाचा आधार घेत खोचक निशाणा साधला आहे. विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्‍दात महसूल,पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उध्‍दव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्याचा समाचार घेतला आहे.

मंत्री विखे पाटील यांनी महाजनसंपर्क अभियानाच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारच्‍या योजनांची माहीती नागरीकांना पत्रक वाटून घरोघरी जावून दिली. याप्रसंगी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या संदर्भात उध्‍दव ठाकरे यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा चांगलास समाचार घेतला. सत्ता आणि पद गेल्‍याचे वैफल्‍य कसे असू शकते याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे उध्‍दव ठाकरे आहेत. राजकारणात टिका केली जाते परंतू टिका करण्‍याची पातळी उध्‍दव ठाकरे यांनी सोडली असल्‍याची टि‍का करुन, ते म्‍हणाले की, स्‍वत:च्‍या वडीलांच्‍या विचारांनाही तुम्‍ही कलंक लावला.

विचारांची तडजोड करुन,सत्ता स्‍थापन केली. आपल्‍या सत्‍तेच्‍या काळातच औरंगजेबाच्‍या कबरीवर फुले वाहीली गेली. महाराष्‍ट्राला तो कलंक तुमच्‍यामुळेच लागला. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेस नेत्‍यांकडून होत होता. तेव्‍हाही तुम्‍ही त्‍यांच्‍या मांडीला मांडी लावून बसलात. क्रांतीकारकांच्‍या विचारांना तुम्‍ही कलंकीत केले. कोव्‍हीड काळात मुंबई महापालिकेतील घोटाळे आता बाहेर येत आहेत. हा कलंक तुम्‍ही कसा विसरता? असा सवालही त्‍यांनी आपल्‍या भाषणातून केला.

Radhakrushna Vikhe on Uddhav Thackeray :
Devendra Fadanvis- Uddhav Thackeray: तर २०१९ ला ठाकरेंनी धोका दिलाच नसता..; फडणवीसांचा मोठा खुलासा

देशामध्‍ये आज मोदीजींच्‍या विरोधात तिस-या आघाडीचा होत असलेला प्रयोग कधीही यशस्‍वी होणार नाही. आघाड्यांचे प्रयोग कसे असतात हे महाराष्‍ट्राने अनुभवले आहे. विरोधकांच्‍या वर्जमुठीला तडे जाणार हे मी यापुर्वीच सांगितले होते. आता मुठही शिल्‍लक राहीलेली नाही. केवळ व्‍यक्तिव्‍देशापोटी मोदींवर टिका करण्‍याचे काम सुरु आहे असे विखे म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जावून देशाच्‍या लोकशाही व्‍यवस्‍थेवर टिका करतात परंतू त्‍यांना निवडणूकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्‍याचे संख्‍याबळही या पक्षाकडे आता राहीलेले नाही. परंतू या विरोधकांना जनतेच्‍या मनात कोणतेही स्‍थान नाही असे सांगत विखे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com