Officer Transfers : सनदी अधिकारी पाटील यांचा झाला तुकाराम मुंडे; साडेचार महिन्यांत झाली तिसऱ्यांदा बदली

Officer Transfers : अजितदादांनी पिंपरीत आणलेल्या राजेश पाटलांची पुण्यातूनही तीन महिन्यांतच उचलबांगडी
Officer Transfers Rajesh Patil
Officer Transfers Rajesh Patil Sarkarnama

पिंपरी : राज्यात सत्ताबदल होताच नव्या शिंदे-फडणवीस सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या केल्या. पण त्यात नंतर मोठा घोळ दिसून आला होता. अनेकांच्या बदल्या काही दिवसांतच फिरविण्यात आल्या.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील मतैक्याअभावी अनेकांना कित्येक दिवस बदलीनंतर नियुक्तीच देण्यात आली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली झालेले सनदी अधिकारी राजेश पाटील यांची तर साडेचार महिन्यांत तिसऱ्यांदा आज (ता.३०) राज्य सरकारने बदली केली.

चार महिन्यात तिसऱ्यांदा उचलबांगडी झाल्याने पाटील यांची गत निर्भीड आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यासारखीच आता होऊ लागली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांना पिंपरीत आणले होते. राज्यात सत्तांतर होताच पाटील यांची १६ ऑगस्टला मुंबईत एमटीडीसीचे एमडी तथा राज्य पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुंबईत राज्य सरकारने बदली केली.

Officer Transfers Rajesh Patil
Rahul Gandhi : '२०२४ च्या निवडणुकीत राहुल गांधीच असतील पतंप्रधान पदाचा चेहरा'

मात्र, त्यांना पुण्यातच राहायचे होते. म्हणून ते दीड महिना मुंबईत हजरच झाले नाही. अखेरीस ३० सप्टेंबर रोजी त्यांची दीड महिन्यात दुसऱ्यांदा बदली पुण्यात सैनिक कल्याण, संचालक या दुय्यम ठिकाणी राज्याच्या नगरविकास विभागाने केली. तेथे हजर झाल्यावर तीन महिन्यातच आज पुन्हा त्यांना मुंबई नाही, पण नवी मुंबईत पाठवण्यात आले आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची साडेचार महिन्यात तिसऱ्यांदा बदली झाली आहे. तर तेथील अश्विनी मुदगल यांना एमएमआरडीएचे अतिरिक्त आय़ुक्त म्हणून मुंबईत पाठवले गेले.

पुणेच हवे असलेले पाटील हे आता नवी मुंबईत हजर होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. पाटलांबरोबर पिंपरी महापालिकेत आलेले व नंतर त्यांच्याशी मेतकूट जमलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही १३ सप्टेंबर रोजी बदली झाली. मात्र, त्यांना तब्बल चाळीस दिवसानंतरही नियुक्ती देण्यात आली नव्हती.

Officer Transfers Rajesh Patil
CM : मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे शिळ्या कढीला उत, अजित पवारांचा खोचक टोला..

पाटील यांच्या खेरीज इतर आणखी पाच सनदी अधिकाऱ्यांच्याही सरकारने आज बदल्या केल्या. २०१६ च्या आयएएस बॅचच्या डॉ. इंदूराणी जाखर यांची माविम म्हणजे महिला विकास महामंडळाच्या एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक, तर दिपक शिंगला यांची पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. भाग्यश्री बानायत यांना नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदलीवर पाठवण्यात आले आहे. तर अजय गुल्हाणे यांना नागपूर स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आहे. त्यांच्याकडे नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com