बारामती : घरात विवाहाचं प्रसंग असला की, वधुवरांच्या, कुटुंबाच्या आनंद वेगळाच असतो. दोन्ही घरचे वातावरण आनंदमयी असतो. हाच आनंद बारामती येथील, माळेगाव बुद्रूक येथे राहणाऱ्या येळे कुटुंबियांमध्येही होता. मात्र येळे कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला. काहीच दिवसांपूर्वी लग्नासाठी नवरदेव म्हणून उभा राहिलेल्या सचिन उर्फ बबलू अनिल येळे ( वय २५ रा.माळेगाव ) याचे आज पहाटे हृदयविकाराने निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लग्नासाठी घरासमोर येळे कुटुंबाने मंडप उभारले होते. आता या मंडपातच नवरा मुलाचा मृतदेह ठेवण्याची दुर्देवी वेळ येळे कुटुंबियांवर आली. नवरा मुलगा सचिन सचिनचं दुर्देवी मृत्यू झाल्याने परभणीतून आलेली नववधू हर्षदा ही मानसिकरित्या खचली. मयत सचिनच्या आई-वडीलांसह नातेवाईकांचा लग्न मंडपातील आक्रोश अक्षरशः लोकांचो हृदय पिळवटून टाकणारा होता. या दुखःद घटनेने माळेगाव परिसरात कमालीची शोककळा पसरली, असून एकच हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, माळेगाव साखर कारखान्याचे कर्मचारी अनिल येळे (रा.माळेगाव-येळेवस्ती) यांचा तिसरा मुलगा सचिन येळे यांचा विवाह परभणी येथील हर्षदा हिच्याशी शनिवार (ता.१९) रोजी शारदानगरच्या अनुज गार्डनमध्ये मोठ्या उत्साहात झाला. त्यानंतर या वधूवरांनी रविवार व सोमवारी देवदर्शन केले आणि त्यांची सत्यनारायणाची पुजा मंगळवार (ता. २२) रोजी झाली.
पुजेच्या दुसऱ्यांच दिवशी म्हणजे बुधवारी मध्यरात्री सचिन याला हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. नातेवाईकांनी त्याला तातडीने वैद्यकिय उपचारासाठी बारामती शहरात नेले, परंतु उपचारापुर्वीच सचिनची प्राणज्योत मावळल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानुसार गुरवारी पहाटे या दुर्घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि माळेगावसह परिसरात अनेकांना धक्का बसला. नातेवाईकांसह माळेगावकरांनी मयत सचिनच्या अंतविधीला मोठी गर्दी केली होती.
हर्षदाचे स्वप्न उद्धवस्त झाले :
माळेगावमध्ये येळे कुटुंबियांमध्ये सून म्हणून आलेल्या हर्षदाच्या हातामधील चुडा, मेंदी आणि आंगावरील हळद तशीच होती, असे असताना संसाराच्या सुरवातीलाच अचानकपणे हर्षदाचा पती सचिनचा हृदयविकाराने अंत झाला. या घटनेने मात्र नववधू हर्षदाचे स्वप्न पुर्णतः उद्धवस्त झाले. अर्थात हषर्दाच्या आयुष्यापुढे निर्माण झालेला दांडगा प्रश्न कसा सुटणार, याची चिंता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.