Karad : मुख्यमंत्र्याच्या झंझावती दौऱ्यासाठी कऱ्हाडला जय्यत तयारी

मुख्यमंत्री CM Eknath Shinde पहिल्यांदाच First time in Karad कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या झंझावती दौऱ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच कऱ्हाड दौऱ्यावर येत आहे. त्यासाठी प्रशासनाकडुन जय्यत तयारी सुरु असुन ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उदघाटन, भुमिपुजन आणि शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या झंझावती दौऱ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे.

शिवसेनेतुन फारकत घेवुन मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना तयार करुन त्या माध्यमातुन भाजपच्या सहकार्यातुन स्वतंत्र सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्याचे सुपूत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या कऱ्हाड दौऱ्याविषयी मोठी उत्सुकता आहे. मुख्यमंत्र्यांचे उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता येथील विमानतळावर आगमन होणार आहे.

तेथुन ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या कऱ्हाड येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यांच्या समवेत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील असणार आहेत.

CM Eknath Shinde
Karad : पृथ्वीराज चव्हाणांच्या विकास कामांचे एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार उद्‍घाटन 

त्यानंतर त्यांच्या हस्ते कऱ्हाड बाजार समिती, शासनाचा कृषी विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजीत राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते कऱ्हाडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे उदघाटन होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यानचा पुल आणि रेठरेच्या पुलाचे भुमीपुजन होणार आहे. त्यानंतर दुपारी येथील शासकीय विश्रामगृहाचे उदघाटन होईल. त्यासाठी मंत्र्यासमवेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. मुख्यमंत्री पहिल्यांदाच कऱ्हाडला येत असल्याने त्यांच्या झंझावती दौऱ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरु आहे.

CM Eknath Shinde
Karad : कराड दक्षिणमधून अतुल भोसलेंनाच आमदार करा... जयकुमार गोरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com