आमच्या विरोधकांना रेटून खोटं बोलण्याची सवय : ग्रामपंचायतींच्या दाव्यावरून भरणेंचा पाटलांना टोला

विधानसभेच्या दोन निवडणुकींमध्ये त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे.
Dattatray Bharne &Sarpanch
Dattatray Bharne &SarpanchSarkarnama
Published on
Updated on

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील आमच्या विरोधकांना रेटून खोटे बोलण्याची सवय आहे. खोटे बोलून ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तसेच, २४६ ग्रामपंचायत सदस्यापैकी १६० ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे असल्याचा दावा माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharne) यांनी करत माजी सहकारमंत्री तथा भाजप (BJP) नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नाव न घेता टीका केली. (Our opponents have a habit of lying : Dattatrey Bharne's taunt to Harshvardhan Patil)

इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये ग्रामपंचायतीच्या वर्चस्वावरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. भाजपच्या दाव्यानंतर आज भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची शिरगणती करून इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे दाखविले.

Dattatray Bharne &Sarpanch
फडणवीसांनी दिला अक्कलकोटमधील नूतन सरपंचांना कानमंत्र : कल्याणशेट्टींनी केला २० सरपंचांचा सत्कार

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,प्रशांत पाटील,सचिन सपकळ उपस्थित होते. या वेळी भरणे म्हणाले की, विरोधकांना दिशाभूल करण्याची सवय आहे. ग्रामपंचायतीच्या निकालानंतरही त्यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. त्यांचा हा स्वभाव असून त्याकडे दुर्लक्ष करा. विधानसभेच्या दोन निवडणुकींमध्ये त्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. त्यांनी खोटा दावा केल्यामुळे राष्ट्रवादीचे सदस्य सर्वजण उपस्थित राहिले असून विरोधकांचा दावा खोडून काढला आहे.

Dattatray Bharne &Sarpanch
नारायणआबा टेन्शन घेऊ नका; सर्व काही ठिक होईल : मुख्यमंत्री शिंदेंनी दिला 'हा' शब्द

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काही गावामध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले होते. विजयी व पराजय झालेले सदस्य आमचेच आहेत. २४६ ग्रामपंचायतीच्या सदस्यांपैकी १६० ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विराेधकांना फक्त ७५ जागा मिळाल्या असून ११ जागा संमिश्र असल्याचे भरणे यांनी सांगून इंदापूर तालुक्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचे सांगितले.

Dattatray Bharne &Sarpanch
‘शहाजीबापू, वसंतदादा सूतगिरणी, राधाकृष्ण संघ, क्रेडीट सोसायटीचे काय झालं तेही सांगा’

राष्ट्रवादीच्या सरपंचांची गावानिहाय यादी

रुपाली गोलांडे (कळाशी), राहुल चव्हाण (कुरवली), राजेंद्र राऊत (म्हसोबाची वाडी), मनिषा गवळी (डिकसळ), योगेश खरात (रणगाव), आशा डोंबाळे (न्हावी), अतुल झगडे (झगडेवाडी), मंदा ठोंबरे (बोरी), समाधान गायकवाड (जांब), चित्रलेखा ढोले (लाखेवाडी), मंगल व्यवहारे (माळवाडी) व अश्‍विनी बंडगर (मदनवाडी).

इंदापुरातील १८ गावांत राष्ट्रवादीचा होणार उपसरपंच...

माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, २६ ग्रामपंचायतीपैकी १८ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असून उपसरपंचच्या निवडणूकीमध्ये १८ पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचा उपसरपंच हाेणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com