Padma awards News : देशातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जणाऱ्या पद्म पुरस्काराची (Padma awards) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीकेली. यात महाराष्ट्रातील १२ जणांचा समावेश आहे. उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले.यात महाराष्ट्रातील 12 दिग्गजांना समावेश आहे. तबलावादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, दीपक धर (अभियांत्रिकी), विख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना यांना पद्मभूषण तर साहित्यिक रमेश पतंगे, समाजसेवक भिकुजी इदाते, झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, सामाजिक कार्यकर्ते गजानन माने, अभिनेत्री रविना टंडन, कुमी वाडिया यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कर्नाटकचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा, सपा नेते मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला.सन २०२३ साठी एकूण १०६ पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यात ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण व ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
यामध्ये १९ महिलांचा समावेश असून ७ मरणोत्तर व २ परदेशी वा अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. औरंगाबादचे लोकसाहित्यिक डॉ. प्रभाकर मांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, समाज कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसह विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी किंवा सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.