Amol Kolhe News : 'या' महिन्यातील संसदेचं अधिवेशन लोकसभेचं शेवटचं ठरणार,मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये होणार ? खासदार कोल्हेंचा मोठा दावा

Modi Government Political News : '' मोदी या हुकमी ब्रॅण्डचा करिष्मा ओसरू लागल्याने...''
Amol Kolhe News
Amol Kolhe NewsSarkarnama

Pimpri Chinchwad : केंद्रातील मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून पाच दिवस बोलावले आहे. त्याचा अजेंडा अद्याप जाहीर झालेला नाही. तर, हे अधिवेशन या १७व्या लोकसभेचे शेवटचं असू शकते. त्यानंतर लोकसभा विसर्जित करून मोदी सरकार डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुकीला सामोरे जाऊ शकतं, असा मोठा दावा शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी केला.

एक देश,एक निवडणूक ही मोदी सरकार(Modi Government) ची सध्या अपरिहार्यता झाल्याने त्यांनी तो निर्णय घेतला असल्याचे कोल्हे म्हणाले. म्हणून त्यासाठीच हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला. कारण लोकसभा विसर्जित होण्यापूर्वी घेतल्या जात असलेल्या खासदारांच्या ग्रुप फोटोची तयारी दिल्लीत सुरु झाल्याचे दिल्लीतील सूत्रांनी सांगितल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Amol Kolhe News
Congress Leader Criticize On Modi : मोदींनी नऊ वर्षांत देशावर शंभर लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला, 'या' बड्या नेत्याचा सनसनाटी आरोप

लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक का होऊ शकते,याची कारणमीमांसाही खासदार कोल्हेंनी या चर्चेच्या व्हिडिओत केली आहे. मोदी या हुकमी ब्रॅण्डचा करिष्मा ओसरू लागल्याने तो पूर्ण संपण्याच्या आत त्यांना निवडणूक घ्यायची आहे. तसेच येत्या एप्रिल व मेपर्यंत दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र होणार असून ती बाब विरोधात जाणार असल्याने डिसेंबरमध्येच ती होऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, घरगुती गॅस दरकपातीचे ट्रम्प कार्ड फेल गेल्याने तसेच आगमी पाच राज्यांच्या निवडणुकीत चार ठिकाणी पराभव होणार असल्याचा कल आल्याने मुदतपूर्व निवडणूक एक देश,एक निवडणूक या पद्धतीने मोदी सरकार घेईल,अशी शक्यता वर्तवली आहे.

Amol Kolhe News
Maratha Reservation News : मराठा तरुणांच्या आत्महत्यांमुळे माझं मन व्यथित; आरक्षणावरून सरकारने समाजाची फसवणूक करू नये !

मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा डाव यापूर्वी २००४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या अंगलट आला होता,याकडेही खासदार कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच एक देश,एक निवडणूक ही कल्पना नवी नसून स्वातंत्र्यानंतर १९६७ पर्यंत अशाच पद्धतीने निवडणूक होत होती.१९७० पासून त्यात खंड पडला,अशी माहिती त्यांनी दिली.

जगात बेल्जियम,स्वीडन,दक्षिण आफ्रिका या तीनच देशात वन नेशन, वन इलेक्शन होत असल्याचे सांगत त्यातील स्वीडन आणि दक्षिण आफ्रिकेत ती मतदान पत्रिकेवर होत आहे,असेही खासदार कोल्हे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com