NCP Politics : शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार थेट गोविंदबागेत; दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येण्याची शक्यता पुन्हा बळावली?

Parth Pawar Meets Sharad Pawar in Baramati : ज्येष्ठ नेते शरद पवार आजच्या पत्रकार परिषदेत काहीसे भावुक झाले होते. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. सामान्य लोकात मिसळून त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले, ते कर्तृत्ववान होते, कायम कामासाठी ते झटत होते, सकाळपासूनच ते कामाला लागत असत, असे पवार म्हणाले.
Parth Pawar arrives at Govindbaug residence in Baramati to meet Sharad Pawar
Parth Pawar arrives at Govindbaug residence in Baramati to meet senior leader Sharad Pawar, sparking fresh political discussions within the NCP.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 31 Jan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. शुक्रवारी (ता.30) रात्री उशीरा सुनेत्रा पवार व जय पवार हे मुंबईला रवाना झाले. आज मुंबईत राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक दुपारी दोन वाजता होणार आहे.

या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी पार्थ पवार यांनी बारामतीत गोविंदबाग या निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. पार्थ पवार सकाळीच गोविंदबाग येथे पोहोचले होते.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज सकाळी पत्रकार परिषद झाली. या वेळी शरद पवार काहीसे भावुक झाले होते. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. सामान्य लोकात मिसळून त्यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले, ते कर्तृत्ववान होते, कायम कामासाठी ते झटत होते, सकाळपासूनच ते कामाला लागत असत, असे पवार म्हणाले.

Parth Pawar arrives at Govindbaug residence in Baramati to meet Sharad Pawar
Sanjay Raut : 'भाजप हा मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष, उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय अमित शाह घेणार...'

"आज अजित पवार हयात असते, तर ते घरी बसले नसते, ते फिल्डवरच काम करत असते, असे काहीसे भावनाविवश उदगार त्यांनी या प्रसंगी काढले. पार्थ पवार शरद पवार यांना भेटल्यामुळे व पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी येत्या 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरणाची घोषणा होणार होती.

Parth Pawar arrives at Govindbaug residence in Baramati to meet Sharad Pawar
NCP Reunion: अजितदादा चार वेळा माझ्या घरी आले होते..; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटलांचे मोठे विधान

हे सांगितल्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांचे मनोमिलन होऊन एकच राष्ट्रवादी होण्याची शक्यता बळावली आहे. शरद पवार व सुप्रिया सुळे यात काय भूमिका घेतात या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com