NCP Reunion: अजितदादा चार वेळा माझ्या घरी आले होते..; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटलांचे मोठे विधान

NCP merger news, Jayant Patil statement : जे झालं ते विसरून, पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी जोमाने पुढे नेण्याची,अजितदादांची तीव्र आणि आग्रही भूमिका होती. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता,
Jayant Patil | Ajit Pawar
Jayant Patil | Ajit PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

NCP merger news: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत आता पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दोन्हा राष्ट्रवादी एकत्रिकरणाबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी दिली होती, अजित पवार यांच्यासोबत या विषयावर माझी चर्चा झाली होती, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान विलिनीकणाबाबतचा निर्णय 12 तारखेलाच जाहीर होणार होता , असा गौप्यस्फोट शरद पवारांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला. पण अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे या चर्चेत खंड पडला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Jayant Patil | Ajit Pawar
ZP Election: झेडपी जिंकण्यासाठी ‘पैशांचा पाऊस’! वारेमाप खर्चामुळे उमेदवारांची दमछाक, कर्जासाठी झिजवताहेत बँकांचे उंबरठे

जयंत पाटील म्हणाले, " शरद पवारांच्या समोरच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र व्हावी अशी इच्छा अजितदादांनी व्यक्त केली होती. अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा दादा स्वतः माझ्या घरी आले होते. चार वेळा माझ्या घरी येऊन जेवण करून चर्चा पूर्ण करून गेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी माझ्या घरी आठ ते दहा वेळा चर्चा झाली. शरद पवारांच्या बद्दल अजितदादांना प्रचंड आदर होता,"

जे झालं ते विसरून, पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी जोमाने पुढे नेण्याची,अजितदादांची तीव्र आणि आग्रही भूमिका होती. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता, अजितदादांनी माझ्यावर तारीख ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती. 16 जानेवारी रोजी पार पडलेल्या अजितदादा सोबतच्या बैठकीत हा निर्णय झाला होता, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.