Parth Pawar News : पार्थ पवारांनी बारामतीतल्या बाप्पाला काय साकडे घातले ? राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता

Ajit Pawar News : पार्थ पवार बारामतीत सक्रिय झाले आहेत.
Partha Pawar
Partha Pawar Sarkarnama

Baramati News : गत लोकसभेला मावळातून पराभवाला सामोरे जावे लागलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) पुत्र पार्थ हे आता पवार कुटुंबाच्या होमपिचवर (बारामती) पुन्हा सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी बारामतीतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बुधवारी भेटी दिल्या. या वेळी त्यांनी मंडळ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

पार्थ हे पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) अधूनमधून जात होते. तेथील समस्यांवर सोशल मीडियाद्वारे हल्लाबोल करीत ते प्रशासनाचे लक्ष वेधत होते. मात्र, पिंपरी-चिंचवड भेट आणि तेथील प्रश्नांवर व्यक्त होण्यास त्यांचा मोठा काळ लोटला होता. त्यानंतर आता ते आपल्या कुटुंबाच्या बालेकिल्ल्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. शहरातील अखिल तांदूळवाडी गणपतीला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी गणपतीची आरतीही केली. नंतर पाच सार्वजनिक मंडळांना भेटी दिल्या.

Partha Pawar
Congress Leader Sajjan Kumar : शीख दंगलप्रकरणात काँग्रेस नेता सज्जन कुमार यांना मोठा दिलासा; निर्दोष मुक्तता !

काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी शहर राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर आज पार्थ गणपती मंडळांना भेट देत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवारांच्या दोन्ही मुलांच्या बारामतीत सक्रिय गाठीभेटी वाढल्या आहेत. मात्र, मीडियापासून चार हात दूर राहण्याची काळजी ते आवर्जून घेत आहेत.

पवार कुटुंबातीलच दुसरे नेते आमदार रोहित पवार हे उद्या (ता.२१) त्यांच्याकडे नव्याने जबाबदारी सोपविलेल्या अजित पवारांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. प्रथम ते नवनियुक्त शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या घरच्या गणपतीची आरती करणार आहेत.

त्यानंतर शहरातील गणेश मंडळांना ते भेटी देणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत संपल्याने दीड वर्षापासून शहरात प्रशासक राजवट आहे. दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. डेंगीचा मोठा फैलाव झाला आहे. या समस्यांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने त्या सोडविण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असे गणरायाला साकडे घालण्यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) येणार असल्याचे राष्ट्रवादीचे (शरद पवार) शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Partha Pawar
INDIA And West Bengal : इंडिया आघाडीतील कुरबुरी वाढल्या; पश्चिम बंगालमध्ये पडली ठिणगी; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com