PCMC News : शेखर सिंहाच्या काळात महापालिकेवर 22 हजार कोटींचे कर्ज? पडताळणी होणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

Shekhar Singh Ajit Pawar : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची आठ दिवसांपूर्वी बदली झाली. मात्र, त्यांच्या काळात महापालिकेवर 22 हजार कोटींचे कर्ज झाल्याची चर्चा आहे.
Shekhar Singh Ajit Pawar
Shekhar Singh Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News :पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची आठ दिवसांपूर्वी नाशिक कुंभमेळ्याच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. शेखर सिंह यांच्या बदलीनंतर पालिका वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहेत की विकास कामांच्या नावाखाली महापालिकेवर शेखर सिंह यांच्या कारकिर्दित तब्बल 22 हजार कोटींचे कर्ज झाले आहे. दरम्यान, बुधवारी पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

महापालिकेवर 22 हजार कोटींचे कर्ज झाले आहे का? असे माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले महापालिकेचा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या श्रावण हार्डीकर यांच्याशी वस्तुस्थिती पडताळ्याबाबत सल्लामसलत केली आहे.

अजित पवारांनी पुढे बोलताना सांगितले की, महापालिकेत माझी सत्ता असताना मी कधीही महापालिकेवर कर्ज होऊ दिले नाही. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांच्या कार्यकाळात तशी चर्चा होती मात्र, आपण उत्पन्न वाढवून वसुली योग्य पद्धतीने करण्यावर भर दिला.

Shekhar Singh Ajit Pawar
Sharad Koli : 'भाजप, काँग्रेस की RSS? नितेश राणे कुणाची पैदास..., हाफ चड्डीवाल्यांना शिव्या घालणारे संघाला चालतात का?' ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल

महायुती म्हणून लढण्यास प्रयत्नशिल

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत महायुती होणार की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. दरम्यान, अजित पवारांनी महायुतीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्थामध्ये एकत्र काम व्हावे, निवडणुकांमध्ये आघाडी कायम राहावी, असे भाष्य केले तसेच शेवटी लोकांचा कौल महत्त्वाचा असतो असे सांगितले.

बदलीनंतर सत्कार?

'आप'चे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी शेखर सिंहावर निशाण साधत म्हटले आहे की, शेखर सिंह यांच्या बदलीनंतर पुण्यात विशेषतः पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेकेदारांकडून आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून झालेल्या सत्कार बाबत चर्चा रंगल्या आहेत. आयएएस अधिकाऱ्यांनी असे सत्कार स्वीकारावेत की नाही आणि ते नैतिकतेला धरून आहे का याचा विचार "डीओपीटी"ने करायचा आहे.

Shekhar Singh Ajit Pawar
Pension Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'अच्छे दिन'! पेन्शन आणि रिटायरमेंटच्या नियमात मोठे बदल, कोट्यवधी कुटूंबियांची दिवाळी झाली गोड!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com