जगातील सर्वात मोठी पार्टी सर्वात छोट्या पक्षाच्या नेत्याला का घाबरते ?

AAP|Arvind Kejriwal|BJP|PCMC: दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी भाजपकडून मोडतोड केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध पिंपरी-चिंचवड आप'ने केला आहे.
PCMC AAP, Chetan Bendre
PCMC AAP, Chetan BendreSarkarnama

पिंपरी : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्ष (AAP) तथा आपचे प्रमुख अऱविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या निवासस्थानी भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) (BJP) काल (ता.३० मार्च) मोडतोड केली. त्याचा तीव्र निषेध आप'ने पिंपरी-चिंचवडमध्ये आज (ता. ३१मार्च) केला. जगातील सर्वात मोठी पार्टी (भाजप) सर्वात छोट्या पक्षाच्या (आप) केजरीवालांना का घाबरते, असाही बोचरा सवाल यावेळी आंदोलकांनी विचारला.

PCMC AAP, Chetan Bendre
केवळ 'र' ऐवजी 'ड' असल्याने धनगर समाज आरक्षणापासून वंचित; संसदेत झाली चर्चा

पंजाबात आपचा दणदणीत विजय आणि राष्टीय पातळीवरील वाढता प्रभाव भाजपला मोठी डोकेदुखी होत असल्याने ही तोडफोड करण्यात आली. भविष्यात सत्तेवर येण्यात आपचा अडथळा येणार असल्याने भाजपच्या गुंडांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा हा बेत केला होता, असा आऱोप आपने यावेळी केला. हे कृत्य निंदनीय असून विचाराची लढाई विचराने लढली पाहिजे, असा सल्लाही भाजपला देण्यात आला. भारतीय हे आता धर्म, जात, पंथ, भाषा, लिंग, प्रांत या विचारांना मागे टाकून केजरीवालांचे दिल्ली मॉडेल म्हणजे लाईट, पाणी, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि देशाचा विकास हे राजकारण स्वीकारत आहेत. त्याचा धर्माचा आधार घेऊन सत्तेत बसणाऱ्या पक्षाला (भाजप) त्रास होत असल्याने कालचा प्रकार झाला, असेही यावेळी सांगण्यात आले. कालचा हल्ला ही पहिली पायरी असून भाजप लोकशाही आणि संविधानावर, असे हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे आपचे शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यावेळी म्हणाले.

PCMC AAP, Chetan Bendre
Video : गुलाबराव पाटलांचे एसटी कामगारांबाबत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना आवाहन

मोदी सरकार हाय हाय, अमित शहा हाय हाय, जब जब जुल्मी जुल्म करेंगा सत्ता हे हथियारो से तब तब चपा चपा गुज उठेगा इन्कलाब के नारो से ....अशा घोषणा आम आदमी पक्षातील कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनात दिल्या. चेतन बेंद्रे राज चाकणे, स्वप्नील जेवळे, एकनाथ पाठक अॅड गौतम कुडुक, प्रकाश हगवणे, मोतीराम अगरवाल, ऍड उमेश साठे, भीम मागाडे, अशोक कोठावळे, सरोज कदम, उमेश थोरात, डॉ योगेश बाफना, ब्रम्हानंद जाधव, मुकेश पोखरकर , निखिल बालीघाटे, आशुतोष शेळके, चंद्रमनी जावळे, स्मिता पवार, शिव बोटे, शंकर पवार हे या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com