
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत असलेल्या फोटोसह छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि भगव्या पताक्यामध्ये 'देवाभाऊ' असं लिहिलेली पानभर जाहिरात गत शनिवारी (६ सप्टेंबर) राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. मराठा आंदोलन यशस्वीपणे हाताळत हैदराबाद गॅझेटता जीआर काढण्यात आला. यातून मराठा समाजाला फक्त फडणवीस यांनीच न्याय दिला, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता.
ही जाहिरात नेमकी कोणी दिली? यावर अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह आहे. अशात फडणवीस यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी या जाहिरातीचे बॅनर्स राज्यातील प्रमुख शहरांमध्ये लावले. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा शहरांतील प्रमुख रस्त्यावर ही जाहिरत झळकली. पिंपरी-चिंचवडमध्ये तर विविध महत्वाच्या चौकांमध्ये, महत्वाच्या रस्त्यांवरील भिंतींवर ही जाहीरात पेंट केली होती. यावरून शहरांमध्ये जोरदार चर्चाही झाली. मात्र अवघ्या दोन दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने ही जाहिरात हटवली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात या जाहिरातीवरून मराठा क्रांती मोर्चा संघटना चांगलीच आक्रमक झाली होती. एक तर ही जाहिरातच बेकायदेशीर आहे असे या संघटनेने पत्रकात म्हंटले होते. तसेच अनेक ठिकाणी अस्वच्छ भिंतींवर हे पेंट होते. काही भिंतींवर पान, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याचे आढळून आले होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना होत आहे, असे म्हणत ही जाहिरात काढून टाकावी आणि जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. यासाठी ठिय्या आंदोलनही केले होते.
अखेर शुक्रवारी महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व भागातील रस्त्यांवर आणि चौकात काढलेल्या या जाहिरातीवर पांढरा पेंट दिला. पालिकेने अवघ्या दोनच दिवसांत फडणवीस यांची ही जाहिरात हटवून टाकली. यापूर्वी फडणवीस यांनीही अनधिकृत जाहिराती, बॅनर्स लावले असतील तर ते काढून टाकावेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी रातोतार शहरात ही जाहिरातबाजी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.