पाच वर्षापूर्वी विजयाचा गुलाल, २०२२ ला याच दिवशी टेन्शनच

विजयाची सुखद आठवण पाच नगरसेवक कुटुंबियांना काल दु:ख देणारी ठरली. कारण..
pcmc
pcmcsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची (pcmc)गतवेळची म्हणजे २०१७ चीच नव्हे, तर त्याअगोदरची २०१२ ची सुद्धा सार्वत्रिक निवडणूक (election) वेळेत झाली होती. दोन्ही वेळी २३ फेब्रुवारीला विजयाचा गुलाल आणि भंडारा उधळला होता. यावेळी, मात्र अद्याप प्रभागरचना सुद्धा फायनल झालेली नाही. तसेच मोडतोड झालेल्या प्रभागामुळे अगोदरच कासावीस झालेल्या काही नगरसेवकांचा जीव आरक्षण कसे पडते व त्यातून आपला पत्ता कट होतो. याचेही मोठे टेन्शन आहे.

त्यामुळे यावेळच्या २३ फेब्रुवारीला म्हणजे काल गुलालाची उधळण सोडा, त्याची साधी ऑर्डरही दिली गेली नाही. परिणामी त्यांनी आपल्या मागील विजयाचा मागील स्मृतींना पुन्हा उजाळा देत तो सोशल मिडियावर पुन्हा एकदा साजरा केला..तर, पाच कुटुंबाना,मात्र या विजयाच्या आठवणी नकोशा ठरल्या. त्या त्यांना आता वेदना देत आहेत.

यावेळची पालिका निवडणूक (Pimpri Chinchwad Municipal Corporation)उशीरा तर होणार आहेच. पण, ती किती उशीरा हे चित्रही स्पष्ट झालेले नाही. कारण प्रभाग रचनेवरील हरकतींवर उद्या (ता. २५) सुनावणी होऊन पुढील महिन्यात ती फायनल होणार आहे. दुसरीकडे पुढील महिन्यातच १३ तारखेला पालिकेची मुदत संपत आहे. त्यामुळे पालिकेवर प्रशासक येणे हे नक्की झाले आहे.

ओबीसी आरक्षणचा प्रश्न न्यायालयात असल्याने यावेळचे पालिका निवडणुकीतील आरक्षणही जाहीर झालेले नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय एकाही पक्षाला निवडणूक नको असल्याने यावेळची निवडणूक पुढे गेली आहे.दरम्यान, प्रभागरचना बदलली आहे. आता चारऐवजी तीनचा प्रभाग झाल्याने प्रभागातील आरक्षणातही बदल होणार आहे.

अगोदरच काही नगरसेवक आणि इच्छूकांचा जीव मोडतोड झालेल्या प्रभागामुळे कासावीस झालेला आहे. त्यात आरक्षण कसे पडते यामुळे तो आता आणखी टांगणीला लागलेला आहे. परिणामी महिला नगरसेवक असलेल्या ठिकाणी तो पुरुष होण्याच्या शक्यतेतून सध्या विद्यमान नगरसेविका या आपल्या प्रभागात आपला पती व मुलाला घेऊन घरोघरी भेटी देत आहेत. याउलट स्थिती पुरुष नगरसेवक असलेल्या वॉर्डात आहे. तो महिला होईल, या भीतीने ते आपली बायको, सून यांच्यासह मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

pcmc
महेश मांजरेकरांवर गुन्हा दाखल ; लहान मुलांचं वादग्रस्त चित्रिकरण

गतवेळी २१ फेब्रुवारीला झालेल्या पालिका निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी ही दोन दिवसांनी (ता.२३) होऊन विजयाला गुलाल,भंडार उधळला गेला होता.त्या सुखद आठवणींना काही नगरसेवकांनी आपल्या विजयी मिरवणुकीचे फोटो स्टेटसवर ठेवून काल दिला. मात्र, ही विजयाची सुखद आठवण पाच नगरसेवक कुटुंबियांना काल दु:ख देणारी ठरली. कारण या कुटुंबांतील दत्ता साने, जावेद शेख (दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस),लक्ष्मण उंडे (भाजप) या तीन नगरसेवकांचे कोरोनामुळे अकाली निधन झाले. तर,अर्चना बारणे (भाजप) या डेंगीच्या बळी ठरल्या.

पाचव्या कुटुंबातील शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे पती व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे अश्विनी चिंचवडे यांनी काल आपल्या नगरसेवक निवडणुकीतील गतवेळच्या विजयाच्या दिवशी पतींच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे फोटो डीपीवर ठेवून सहवेदना व्यक्त केल्या. तर, बाकीच्या चार नगरसेवक कुटुंबियांच्या दृष्टीनेही कालच्या विजय दिनाच्या आठवणी या वेदनादायकच होत्या.

pcmc
मलिक-देशमुख जेलमध्ये एकत्र डबा खातील ; मलिकांचे वादग्रस्त व्हिडिओ समोर आणणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com