Pimpri-Chinchwad : येत्या १९ तारखेपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यासाठी सलग पाच वर्षाची एकदाच परवानगी देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अगोदरच गूड न्यूज दिली आहे. त्यानंतर आता या मंडळांचे मंडप भाडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने यावर्षी माफ करून दुसरी चांगली बातमी दिली. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल त्यांनी महापालिकेचे त्यांनी आभार मानले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मंडप, स्टेज, कमान परवाना शुल्क तथा मंडप भाडे माफ करावे, यासाठी भाजपच्या (BJP) माजी उपमहापौर शैलजा मोरे व सिंधूनगर युवक मित्र मंडळ कार्याध्यक्ष अरुण थोरात यांनी आठवड्यापूर्वी (२९ऑगस्ट) पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांना पत्र दिले होते. त्यांची ही मागणी मान्य करीत आयुक्तांनी काल तसा आदेश काढला.
त्याचा शहरातील शेकडो मंडळांना फायदा झाला असून त्यांची मोठी बचत झाली आहे. कारण त्यासाठी पालिका प्रतीचौरस फूट पन्नास रुपये फी त्यांच्याकडून आकारत होती. दरम्यान, ठाणे आणि नवी मुंबईनंतर हे शुल्क माफ करणारी पिंपरी-चिंचवड ही तिसरी महापालिका ठरली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गणेश मंडळांना मंडप भाडे आकारण्यात येऊ नये, असा निर्णय झाला होता. त्यानुसार ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेत त्याची अंमलबजावणी सुरु झाली. मात्र, पिंपरी चिंचवडला ती झाली नव्हती. मोरे यांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यासाठी पाठपुरावाही केला. त्यनंतर हा माफीचा आदेश आयुक्तांनी काल काढला. त्यामुळे या वर्षासाठी घेतलेली हे शुल्क पालिका आता सबंधित मंडळांना परत करणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.