PCMC Nivadnuk: पिंपरीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 34 उमेदवार रिंगणात; दोन महिलांचाही समावेश, कोणत्या पक्षात किती? जाणून घ्या!

PCMC electoin 17 candidates with criminal backgrounds: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्जात दाखल केलेल्या माहितीवरुन ही बाब समोर आली आहे.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

PCMC Nivadnuk 2026: 'पुण्यातील गुन्हेगारी संपवा,' असे राजकीय नेते सांगत असले तरी अनेक प्रभागात गुन्हेवारी पार्श्वभूमी असलेले तर काही ठिकाणी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अशा उमेदवारांची संख्या अधिक आहे. उमेदवारी अर्जात दाखल केलेल्या माहितीवरुन ही बाब समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी अनेक पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली आहे.

कागदावर स्वच्छ प्रतिमा असणारे पण पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये राजकीय गुंड असा उल्लेख असणारे 17 जण सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. यांच्यासोबत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात दोन महिलांचा समावेश आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये भाजपचे 17, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 4 जण आहेत. यात दोन महिला उमेदवारही आहेत.पोलिसांच्या दप्तरी राजकीय गुंड म्हणून नोंद असणारे भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 7 आणि शिवसेनेच्या 2 जणांचा समावेश आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 8 पती राजांच्या पत्नी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

अजित पवार यांच्या पक्षावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना सर्वाधिक उमेदवारी दिल्याचा आरोप होत आहे. प्रामुख्याने पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना प्रभाग ९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर 'हाफ मर्डर'सारखे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

PCMC
पुण्याचे सर्वात प्रामाणिक महापौर...पेट्रोलचा कोटा संपला म्हणून चालत जायचे महापालिकेत

हे प्रकरण न्यायप्रविष्ठ : सिद्धार्थ बनसोडे

तीन वर्षांपूर्वींचे दाखल गुन्ह्यांचे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. विरोधकांनी आताच्या मुद्यांवर बोलावे. मी सर्वसामान्य तरुण म्हणून निवडणूक लढवत आहे. विरोधकांकडूनच मला आमदार पुत्र संबोधण्यात येत आहे. प्रभागातून मला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून असे आरोप करण्यात येत आहेत, असे सिद्धार्थ बनसोडे यांनी म्हटले आहे.

आंदेकर कुटुंब

पुण्यातील आंदेकर टोळीशी संबंधित सदस्यांना उमेदवारी दिल्याने मोठे वादंग झाले आहे. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांची वहिनी लक्ष्मी आंदेकर यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे. या दोघीही एका हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.

राष्ट्रवादीने गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे, बापू ऊर्फ कुमार प्रभाकर नायर, पिंटू धवडे आणि रोहिदास चोरगे यांनाही उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे. 'जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत कोणालाही गुन्हेगार म्हणता येणार नाही,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निर्णयाचा बचाव करताना म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com