PCMC Election : पिंपरी-चिंचवडमध्ये अश्विनी जगतापांचा मतदानापूर्वीच स्टेटस बॉम्ब; 'नमकहरामी' म्हटलेल्या माऊली जगतापांचं काय झालं?

Political News : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नेहमीच चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप कुटुंबियांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जगताप कुटुंबातील अंतर्गत कलह पुढे आला आहे.
Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Shankar Jagtap - Ashwini Jagtap Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नेहमीच जगताप कुटुंबियांचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जगताप कुटुंबातील अंतर्गत कलह पुढे आला. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत आणि आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने या कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चव्हाटयावर आला होता. येथील मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना माजी आमदार अश्विनी जगताप यांनी शंकर जगताप यांच्या जवळचे मानले जाणारे माऊली जगताप यांच्या पोस्टवर संताप व्यक्त केला होता. 'हे स्वप्न नाही तर ही नमक हरामी आहे' अशा शब्दांत टीका केली होती. मात्र, अशा स्वरूपाची टीका केल्यानंतर नवी सांगवी प्रभागात नेमका कोणाचा विजय झाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. पण त्यापूर्वीच स्टेटस वॉरने खळबळ उडाली होती. माउली जगताप यांनी '15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न, शपथ प्रत्यक्षात साकार झाले. साथ असावी आयुष्यभराची हीच माझी आशा.... कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा... आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही.... तुमच्या सगळ्यांचे आभार....!' असे पोस्टमध्ये म्हटले होते.

यावर मतदानाला काही तास शिल्लक असताना अश्विनी जगतापांनी 'निष्ठा की विश्वासघात?' असा प्रश्न उपस्थित करीत दिरावरच निशाणा साधला होता. अश्विनी जगताप यांनी लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? अशी पोस्ट करीत अश्विनी जगतापांनी दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांच्या काळजात हात घातला होता. माऊली जगतापांनी टाकलेला फोटो आणि तो आशय याचा स्क्रिनशॉट ही सोबत जोडला होता.

Shankar Jagtap - Ashwini Jagtap
BJP-Shivsena News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपच मोठा भाऊ, युती तोडल्याचा शिवसेनेला फटका!

शंकर जगतापांनी (Shankar Jagtap) माऊली जगतापांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली. माऊली हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये रहायला आहेत. त्यामुळे माऊली यांनी प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केले, अशी चर्चा भाजपचे स्थानिक सुरुवातीपासूनचे करत होते. मात्र माऊली प्रभाग 31 चे उमेदवार असतील याची शंकर जगतापांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच खबर लागू दिली नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोगाने यादी जाहीर केली, तेव्हा प्रभाग 31 मधील भाजपला हा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर स्थानिकांनी आयात उमेदवार नको, अशी मोहीम राबवली. अशात अश्विनी जगताप यांच्या स्टेटसमुळे माऊली जगताप अडचणीत येणार अशी चर्चा होती.

Shankar Jagtap - Ashwini Jagtap
Sharad Pawar NCP Politics : भाजपचा मोठा धक्का! शरद पवारांच्या माजी आमदाराचा बालेकिल्ला उद्ध्वस्त! निवडणुकीत गजभिये पराभूत

प्रभाग क्रमांक 31 मध्ये अटीतटीची निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र जगताप यांना 7 हजार 988 मते पडली तर भाजपचे उमेदवार माउली जगताप यांना 8 हजार 511 मते पडली तर अपक्ष सागर परदेशी यांना 6 हजार 123 मते पडली. याठिकाणी अपक्ष परदेशी यांच्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे माउली जगताप केवळ 523 मतांनी विजयी झाले आहेत. अश्विनी जगताप यांच्या या वक्तव्यामुळेच या ठिकाणी माउली जगताप यांचा कमी मताधिक्यांनी विजय झाला असल्याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com