PCMC Election : निष्ठा की विश्वासघात? मतदान काही तासांवर अन् दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या घरात वादळ; अश्विनी जगतापांचा खळबळ उडवणारा स्टेटस

, BJP Candidate Controversy News : आमदार जगतापांनी दिलेला उमेदवार हा 'नमकहरामी' आहे असे स्टेटस अश्विनी जगतापांनी ठेवले आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार माऊली उर्फ ज्ञानेश्वर जगतापांना उद्देशून हा व्हाट्सएप स्टेटस ठेवले असल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.
laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpgsarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. मतदानाला काही तास शिल्लक असल्याने

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग 31 मधून माऊली जगताप यांना शंकर जगतापांनी (Shankar Jagtap) पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे यानिमित्ताने जगताप दीर-वहिनीतील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. माऊली जगतापला उमेदवारी दिल्यानंतर त्याने गुलालात माखलेला एक फोटो आणि त्यासोबत 'पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं!' अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यावरून अश्विनी जगतापांनी शंकर जगतापांनी 'नमकहरामी'ला उमेदवारी दिल्याची पोस्ट केली.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Thackeray VS BJP : भाजपचे शस्त्र त्यांच्यावर उलटणार? मुंबईसाठी ठाकरेंच्या शिलेदाराकडून 'ती' घोषणा

शंकर जगतापांनी माऊली जगतापांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली. माऊली हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये रहायला आहेत. त्यामुळे माऊलीने प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केले, अशी चर्चा भाजपचे स्थानिक सुरुवातीपासूनचे करत होते. मात्र माऊली प्रभाग 31 चे उमेदवार असतील याची शंकर जगतापांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच खबर लागू दिली नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोगाने यादी जाहीर केली, तेव्हा प्रभाग 31 मधील भाजपला हा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर स्थानिकांनी आयात उमेदवार नको, अशी मोहीम राबवली.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Shivsena UBT Politics: वसंत गिते यांचे अस्तित्व पणाला, भाजपसह स्वपक्षीयांनीही घेरल्याने महापालिकेसाठी एकहाती लढत!

त्यानंतर मतदानाला काही तास अवधी असताना माऊली जगतापांनी सोशल मीडियावर गुलालात माखलेल्या स्वतःच्या फोटोसह एक पोस्ट केली. त्यामध्ये '15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न, शपथ प्रत्यक्षात साकार झाले. साथ असावी आयुष्यभराची हीच माझी आशा.... कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा... आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही.... तुमच्या सगळ्यांचे आभार....!' असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Congress news : काँग्रेसला धक्का; उद्धव सेना- भाजपचे प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य

त्यानंतर अश्विनी जगताप (Ashvini jagtap) यांनी लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? अशी पोस्ट केली आहे. मतदानाला काही तास आधी अश्विनी जगतापांनी हा संदेश देऊन, दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांच्या काळजात हात घातला आहे. माऊली जगतापांनी टाकलेला फोटो आणि तो आशय याचा स्क्रिनशॉट ही सोबत जोडला आहे.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Latur NCP : नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय खेचून आणला, पण नियतीनं तो आनंद काही दिवसांतच हिरावला

'15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाले," असे म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्याच सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास?' याचा अर्थ असा की, तू 15 वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या 'शेवटाची' वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले? हे स्वप्न नाही, तर ही 'नमकहरामी' आहे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप. विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझ स्वप्न नाही तर तुझा सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे!, अशी पोस्ट करत अश्विनी जगतापांनी संताप व्यक्त केला.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Congress उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, थोडक्यात जीव वाचला Ravindra Chavan, Nanded Election

या स्टेट्समधून त्यांनी केवळ माऊली जगतापांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला नाही तर भाऊंशी 'नमकहरामी' केलेल्यास उमेदवारी दिली असे म्हणत दीर शंकर जगतापांवरही अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. अश्विनी जगताप यांच्या या पोस्टमुळे आता याचे सावट उद्याच्या मतदानावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार शंकर जगताप आणि माऊली जगतापांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली असल्याचे दिसते.

laxman jagtap | shankar jagtap | ashwini jagtap.jpg
Shivsena Vs BJP : भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत तुफान राडा, चार जखमी; उमेदवाराच्या अटकेनंतर वातावरण तापले; रुग्णालयात गोंधळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com