Sunil Shelke In Trouble : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने केली आमदार सुनील शेळकेंची अडचण

Maval Water Supply News : अजितदादांनी माझ्या पश्चात हे काम सुरू करण्याचे आदेश दिले, तर पुढील निवडणुकीला उभाही राहणार नाही, असे आमदार सुनील शेळकेंनी जाहीर केले होते.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSarkarnama

Pimpri Chinchwad News : मावळ तालुक्यातील पवना धरणातून बंद वाहिनीद्वारे पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आणण्याच्या योजनेवरील बंदी राज्य सरकारने ता. ८ सप्टेंबर रोजी उठवली. ती आपल्या पाठपुराव्यामुळे उठल्याचा दावा भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटानेही उपमुख्यमंत्री अजितदादांमुळे ती उठल्याचा प्रतिदावा ठोकला. मात्र, त्यांच्या या दाव्यामुळे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची मात्र गोची झाली आहे. (Pimpri Chinchwad NCP made trouble for MLA Sunil Shelke)

पवना जलवाहिनी प्रकल्पावरील बंदी उठणे, हे अजितदादांचे पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली होती. तशीच ती त्यांच्या पक्षाचे पिंपरी पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनीही दिली होती. अजितदादांनी सत्तेत सहभागी होताच या प्रश्नात लक्ष घातले. महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत त्याचा उल्लेखही केला होता. त्याबाबत बैठकाही घेतल्या. त्यानंतर हा निर्णय झाल्याने दादांचे त्यात योगदान आहे, असे गव्हाणे म्हणाले आहेत. तसेच, त्यात इतरांचेही योगदान असल्याचे त्यांनी प्रांजळपणे कबूल केले होते.

Pimpri Chinchwad News
Shinde Group Allegation : जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाकडून महाराष्ट्रात दंगे घडविण्याचे प्लॅनिंग... ; शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

गव्हाणेंच्या या दाव्यानेच आमदार शेळकेंना अडचणीत आणले आहे. कारण अजितदादा सत्तेत सामील झाल्यानंतर हा निर्णय झाला, असा मावळातील शेतकऱ्यांचाही दावा आहे. तो परवा आमदार शेळके यांनी खोडून काढला. अजितदादा सत्तेत आले अन् ही बंदी उठली, हे खरे असेल तर आमदारकीचा राजीनामा देईन, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले होते.

अजितदादांनी माझ्या पश्चात हे काम सुरू करण्याचे आदेश दिले, तर पुढील निवडणुकीला उभाही राहणार नाही, असे ते पत्रकार परिषदेत गरजले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील त्यांच्या पक्षाच्या पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेवरील भूमिका आणि वक्तव्ये यामुळे त्यांचीच अडचण झाली आहे. मात्र, नेमके खरे काय, हा प्रश्न आता पिंपरी-चिंचवडकरच तर नाही, मावळवासीयांनाही सतावतो आहे.

Pimpri Chinchwad News
CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

दरम्यान, आमदार शेळकेंच्या अडचणीत आणखी भर पडली आहे, ती पिंपरी-चिंचवडमध्ये लागलेल्या दहा मोठ्या फ्लेक्समुळे. गत टर्मअगोदर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाऊन २०१७ ला नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या व पुन्हा आता राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी नगरसेविका माया संतोष बारणे यांनी ते लावले आहेत. त्यावर अजितदादांचा मोठ्या फोटोंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो आहेत. पवना जलवाहिनीवरील बंदी उठवून अजितदादांनी पिंपरी-चिंचवडकरांना मोठे गिफ्ट दिल्याचे त्यात म्हटले आहे, त्यामुळे शहरवासीयांचा पुढील २५ वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने महायुती सरकारचे अभिनंदनही करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad News
Fadnavis On Sunil Kendrekar Report : सुनील केंद्रेकरांचा अहवाल हा अधिकृत समितीचा नव्हता; पण... ; फडणवीस अखेर बोलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com