Pimpri Chinchwad News : शिरोळ, कोल्हापूरच्या पावणेदोन लाखाच्या लाचेचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन!

Shirol News : शिरोळचे मुख्याधिकारी अभिजित हराळे पावणेदोन लाखाची लाच घेताना पकडले
Pimpri Chinchwad News :
Pimpri Chinchwad News : Sarkarnama

पिंपरी : बांधकाम परवाना देण्य़ासाठी पावणेदोन लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल शिरोळ (जि.कोल्हापूर) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित मारुती हराळे (वय ३३, रा. शिरोळ,मूळगाव,भिलवडी,ता.पलूस,जि.सांगली) यांच्यासह चौघांना परवा (दि. २७ फेब्रु) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. त्यांनी आपल्या पंटरमार्फत (खासगी व्यक्ती) ही लाच घेतली होती.

Pimpri Chinchwad News :
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

नगरपरिषदेचे कनिष्ठ अभियंता आणि लिपिकाचा आरोपीत समावेश आहे. चारही आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती ही कारवाई केलेले कोल्हापूर एसीबीचे डीवायएसपी सरदार नाळे यांनी `सरकारनामा`ला काल (दि.२८ फेब्रु) दिली. हराळे हे या अगोदर पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारी होते. पिंपरी पालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून हराळेंनी काम पाहिले होते. तेथून बदली झाल्यानंतर पाच महिन्यांपुर्वीच शिरोळचे मुख्याधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.

शिरोळचे कनिष्ठ अभियंता संकेत हनुमंत हंगरगेकर (वय २८,रा.जयसिंगपूर,जि.कोल्हापूर,मूळ रा. उस्मानाबाद) आणि लिपिक सचिन तुकाराम सावंत हे ही या लाचखोरीत आरोपी आहेत. त्यांनी अमित तानाजी सकपाळ या पंटरमार्फत (खासगी व्यक्ती) ही लाच घेतली होती. ती बांधकाम परवाना देण्यासाठी एक बांधकाम व्यावसायिकाकडून घेण्यात आली होती.

Pimpri Chinchwad News :
Maharashtra Budget Session : "विधीमंडळ नाही, चोरमंडळ.." ; राऊतांची घणाघाती टीका

बांधकाम परवाना मिळण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनही अर्ज या व्यावसायिकाने नगरपरिषदेकडे केला होता. त्यांची ही फाईल मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविण्याकरिता बांधकाम विभागातील क्लार्क सावंत आणि इंजिनीअर हंगरगेकर यांनी एक लाखाची लाच मागितली. त्यानंतर ते हराळेंना भेटले असता त्यांनी ही फाईल पास करून परवाना देण्यासाठी ७५ हजार रुपये मागितले.

तसेच हराळे व हंगरगेकर यांनी ही लाच सावंतकडे, तर सावंतने ती सकपाळकडे देण्यास सांगितले. त्यानुसार सकपाळला ही लाच घेताना परवा (२७ फेब्रुवारी) पकडण्यात आले. त्याच्या जबाबानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com