बिल्डरला सव्वानऊ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पीएचडी धारकाला बेड्या

सोनिगरा बिल्डरकडून त्याने सव्वानऊ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
Pimpri Police arrest PHD holder
Pimpri Police arrest PHD holderSarkarnama

पिंपरी : शिक्षण एमबीए, एमकॉम, पीएचडी आणि धंदा ब्लॅकमेलर असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण, तसं घडलं आहे. अशा पीएचडीधारक उच्चशिक्षीत आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. शहरातील प्रसिद्ध सोनिगरा बिल्डरकडून त्याने सव्वानऊ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यातील पहिला दोन कोटींचा हफ्ता चेक स्वरुपात घेताना त्याला नुकतेच (ता.२७) रंगेहाथ पकडण्यात आले. (Pimpri Chinchwad Police arrest PHD holder)

आदिनाथ भुजाबळी कुचनूर (वय ५४, रा. थेरगाव) असे या उच्चशिक्षित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध न्यायाधीशांच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करणे, आर्किटेक्टला बदनाम करणे, बिल्डरांना ब्लॅकमेल करणे, पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध खोटे आरोप करणे याबद्दल शिवाजीनगर, पुणे येथे दोन, तर पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी आणि पिंपरी पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत.

Pimpri Police arrest PHD holder
किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून शाहू महाराजांना दिली! फडणवीसांचा पलटवार

तो दोन वर्षे येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून आलेला आहे. आता पाचवा खंडणीचा गुन्हा वाकड पोलिस ठाण्यात नोंद झाला. त्यात त्याला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. पुणे, मुंबईतील अनेक बिल्डरांना ब्लॅकमेल करीत त्याने खंडणी उकळली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आढळले आहे. तसेच त्याची सल्लागार फर्मही बोगस निघाली आहे.

शहरातील प्रसिद्ध बिल्डर सोनिगरा रियलकॉनचे केतूल भागचंद सोनिगरा (वय ४१, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचा डांगे चौक, थेरगाव येथे सिग्नेचर पार्क हा तीनशे सत्तर कोटी रुपयांचा बांधकाम प्रोजेक्ट सुरु आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. तरीही त्यात खूप त्रूटी आहेत, तुम्ही प्राप्तीकर चुकवित आहात, तुमच्याविरोधात तक्रार करतो, असे कुचनूरने सोनिगरा यांना पत्र पाठवून धमकावले होते.

Pimpri Police arrest PHD holder
शाहू महाराजांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊत थेट कोल्हापूरातील राजवाड्यावर

या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या अरहाम आर. ई. कन्सलटन्सी सर्व्हिसेस या सल्लागार फर्मची सेवा घेण्यास सांगितले होते. त्याबदल्यात प्रकल्प खर्चाच्या अडीच टक्के म्हणजे सव्वानऊ कोटी रुपयांची मागणी त्याने केली होती. त्यामुळे सोनिगरा यांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी तिची शहानिशा करून कारवाईचा खंडणीविरोधी पथकाला आदेश दिला.

त्यानुसार या व गुंडाविरोधी पथकाने सोनिगरा यांच्या कार्यालयात सापळा लावला. त्यात परवा दोन कोटी खंडणीचा पहिला हफ्ता घेण्यासाठी आलेला कुचनूर अडकला.खंडणीविरोधी पथकाचे सिनिअर पीआय अजय जोगदंड,गुंडाविरोधी पथकाचे एपीआय हरीश माने व त्यांच्या पथकांनी ही कारवाई सीपी शिंदे, डीसीपी काकासाहेब डोळे, एसीपी (क्राईम) पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

दरम्यान, विविधप्रकारे खंडणी मागणाऱ्या व्यक्ती समाजात वावरत असतात. त्यांच्याविरुद्ध सोनिगिरा यांच्याप्रमाणे हिमतीने पुढे येऊन जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करावी. तेथे काही अडचण आल्यास पोलिस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com