Pimpri-Chinchwad News : वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा नुकताच (ता.२१) उद्योगनगरीत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी अंमली पदार्थ तथा ड्रग्जबाबत 'नो कॉम्प्रोमाइज' करण्यास पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तशी कारवाई लगेच सुरु केली आहे.
पुण्यात (Pune) कोंढवा येथे एक कोटी १६ लाख ७४ हजार रुपयांचे अफीम तथा ड्रग पोलिसांनी १७ ऑगस्टला पकडले होते. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ड्रगच्या वाढत्या व्यसनामुळे ड्रगच्या बेकायदेशीर धंद्यावर नो कॉम्प्रोमाइज असे पाटील यांनी चौबेंच्या सत्कारात पोलिसांना बजावले होते. त्यानंतर लगेचच पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने साठ किलो अफूचा साठा जप्त केला. पावणेनऊ लाख रुपये त्याची किंमत आहे.
राज्यस्थानमधून ही अफूची तस्करी महाराष्ट्रात केली जात होती. त्याप्रकरणी मूळच्या राज्यस्थानातील तिघांना अटक करण्यात आली आहे. गॅस एजन्सीच्या नावाखाली ते अंमली पदार्थाचा गैरधंदा महाळूंगे, चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथे करीत होते. त्यांची ही गॅस एजन्सी सुद्धा बेकादेशीरच आहे. तेथे ते घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यापारी सिलिंडरमध्ये धोकादायकपण भरत होते. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस (Police) निरीक्षक संतोष पाटील व पथकाने हा भंडाफोड केला. त्याबाबत पोलीस अंमलदार प्रदिप शेलार व अशोक गारगोटे यांना खबर मिळाली होती.
राकेश जिवनराम बिष्णोई (वय 24 वर्षे), कैलास जोराराम बिष्णोई (वय 23 वर्षे) आणि मुकेश गिरधारीराम बिष्णोई वय 23, तिघेही सध्या रा. महाळूंगे, मूळ रा. राजस्थान) अशी अफू तस्करांची नावे आहेत. त्यांच्याकडून अफूसह एक टेम्पो, चार महागडे मोबाईल, 82 गॅस सिलेंडर रोकड असा एकूण पावणेसतरा लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांना २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.