Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji MaharajSarkarnama

Pimpri Chinchwad News : ३५० ताशे अन् हजार ढोल; शिवरायांना मानवंदना देण्यासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये जंगी तयारी...

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी ३५० ताशे आणि एक हजारपेक्षा जास्त ढोल ३५ मिनिटे वाजवून शिवरायांना भगव्या ध्वजाची मानवंदना देण्यात येणार आहे. हे वादन हे कर्णकर्कश वाटणार नाही, याची खबरदारीही आयोजकांनी घेतली आहे. (Latest Political News)

अखिल पिंपरी- चिंचवड शिवजयंती समन्वय समिती आणि ढोल - ताशा महासंघ आणि शिवप्रेमी नागरिकांनी या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle), आमदार शिवेंद्रराजे भोसले, अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबत अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती समन्वय समितीचे समन्वयक संदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Chhatrapati Shivaji Maharaj
Buldana Maratha Protest : धक्कादायक ! मराठा आरक्षणासाठी तरुणाचे टोकाचे पाऊल; गॅलरीतून उडीचा प्रयत्न

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती शिल्प समूहाला प्रदक्षिणा घालून ढोल-ताशा वाजवत शिवरायांना मानवंदना दिली जाणार आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचे सत्कार आणि भाषणे झाल्यानंतर ढोल-ताशा वादन होणार आहे. (Maharashtra Political News)

ढोल-तशा पथकातील वादक आणि उपस्थितांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. त्यानंतर वादक स्वतः परिसरात स्वच्छता मोहीम घेणार आहेत. या सोहळ्याची शहरात जोरदार तयारी सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. शिवरायांना देण्यात येणाऱ्या या मानवंदनेची संपूर्ण शहराला उत्सुकता लागली आहे.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) सहकार्यवाह जयंत जाधव, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष विशाल मानकर, शिवजयंती समन्वय समितीचे कुणाल साठे, माजी नगरसेवक विजय शिंदे आणि अमित गावडे उपस्थित होते. सुभेदार या चित्रपटाचे कलाकारही या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले.

(Edited by Sunil Dhumal)

Chhatrapati Shivaji Maharaj
Manoj Jarange Patil : "माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं, तर..."; मनोज जरांगेंची बहीण आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com