PM Modi Pune Visit: मोदींच्या सभेवर पावसाचे सावट; एस.पी. कॉलेज ऐवजी 'या' ठिकाणी होणार सभा?

Pune Metro Train PM Modi Visit: मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज भूमीगत मार्गाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. यासोबतच इतरही विकास कामांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार आहेत.
Pune Metro Train PM Modi Visit
Pune Metro Train PM Modi VisitSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. मोदींच्या सभेची (PM Modi Pune Visit) जय्यत तयारी भाजप आणि प्रशासनाने सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी पाणी आणि चिखल साचला आहे. आज ही पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

मैदानावर पाणी साचल्याने आणि चिखल झाल्याने त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाची शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. चिखलावर खडी टाकण्याचे काम सुरु आहे. असे असले तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास या ठिकाणी सभा होणे कठीण आहे. यामुळे प्रशासनाकडून पर्यायी जागेचा विचार करण्यात येत आहे. स्वारगेट येथील महापालिकेच्या सभागृहात (गणेश कला क्रीडा मंच) ही सभा होण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन, आणि उद्घाटनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro Train)सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज भूमीगत मार्गाचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. यासोबतच इतरही विकास कामांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार आहेत.

Pune Metro Train PM Modi Visit
BJP News: प्रेमासाठी वाट्टेल ते...! भाजप नेत्याची बायको हवालदारासोबत पळून गेली!

मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम आहे. मात्र बुधवारी शहरभर पावसाने थैमान घातले असून आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सभामंडप परिसरात पावसाचे पाणी आणि चिखल होऊन सर्वत्र दलदल झाली आहे. ज्या रस्त्याने मोदी स्टेजवर जाणार आहेत, त्या रस्त्यावर आणि मैदानावर सगळीकडे चिखल आहे. सभेच्या स्टेजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

काल (बुधवारी) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सभा स्थळाची येऊन पाहणी केली. महापालिका आणि मेट्रो प्रशासनाला याबाबतच्या काही सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. चिखलावर खडी टाकण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यासाठी खडीचे दहा ते बारा ट्रक देखील मागवण्यात आले होते. इतका आटापिटा करून देखील या ठिकाणी सभा होणे कठीण असल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Pune Metro Train PM Modi Visit
MNS News: मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन; हडपसर मतदारसंघाला न्याय कधी?

प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्यात येत आहे. महापालिकेचे गणेश कला क्रीडा मंचचा येथे सभा घेण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या ठिकाणी सभेची पर्यायी व्यवस्था करण्याचं काम देखील प्रशासनाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असल्याची माहिती आहे. परिस्थितीवर मात करून सभा यशस्वी करण्याचे आव्हान भाजपसह प्रशासनासमोर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com