CM On Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्ग अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

Thane - Shahapur Girder Collapse: आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Eknath Shinde - Samruddhi Mahamarg
Eknath Shinde - Samruddhi MahamargSarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Highway Accident : शहापूरजवळ (Shahapur) समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना गर्डरसह क्रेन कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतकांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. "ही घटना दुर्दैवी असून, या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी दिली. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde - Samruddhi Mahamarg
PM Modi Pune Visit : भष्ट्राचाराचे आरोप केलेल्यांकडून मोदी पुरस्कार स्वीकारणार का ?; ठाकरे गटाचा सवाल

घटनास्थळी एनडीआरएफची टीम (Ndrf Team) दाखल झाली असून, गर्डरखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या डॉग स्कॉटच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाऱ्याखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde - Samruddhi Mahamarg
Ajit Pawar on Sharad Pawar : साहेब अन् दादा वेगळे नाहीत ; अजितदादा असं का म्हणाले ?

सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारात ही घटना घडली आहे. पुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळून हा अपघात झाला. यामध्ये अद्यापही काही जण दबलेले असून, त्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही टि्वट करीत श्रद्धाजंली वाहिली आहे.

महामार्गावर रात्री बांधकाम सुरू होते. हे गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com