PMC News : सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारेंसाठी दीपक मानकरांची 'पॅावर'

Letter to Commissioner : वाघमारे यांच्याविरोधात काहीही कारवाई झाल्यास रस्त्यावर उतरणार : आयुक्तांना दिले पत्र
Deepak Mankar, Prashant Waghmare, Arvind Shinde
Deepak Mankar, Prashant Waghmare, Arvind ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेऊन त्यांच्या बदलीची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली होती. पण आता वाघमारेंच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर सरसावले आहे.

वाघमारे यांच्या कामाचे दाखले देत त्यांची बदली का करू नये आणि शिंदे यांची मागणी कशी चुकीची आहे, हे मानकर आता पटवून देत आहेत.पण वाघमारे यांच्यावरून मानकर आणि शिंदे यांच्यात जुंपण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे मागील 20 वर्षांपासून पालिकेच्या बांधकाम विभागात एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती असल्याचा आरोप त्यांचे भाऊ प्रमोद वाघमारे यांनी यापूर्वी केला होता.

वाघमारे यांच्या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली असून यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यांनी आपल्या कार्यालयात मर्जीतील अधिकारी ठेवले असून त्यांचीही वर्षानुवर्षे बदली झालेली नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Deepak Mankar, Prashant Waghmare, Arvind Shinde
Pravin Darekar News : महायुतीकडे मुख्यमंत्रिपदासाठी तीन चेहरे, दरेकर म्हणतात...

या मागणीचे पत्र शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठविले होते. शहरात समाविष्ट झालेल्या गावांमध्ये होणारी अवैध बांधकामे रोखणे, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये शहर अभियंता प्रशांत वाघमारे अपयशी ठरलेले आहेत. शहरातील पेठांमध्ये वाडे दुरूस्तीच्या नावाखाली वाघमारे यांनी चुकीच्या पद्धतीने बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत.

त्यांची शहर अभियंता या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी शहरात एक चौरस फूट बांधकाम करण्यास विकसक घाबरत होते. मात्र, वाघमारे यांनी या पदावर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्रासपणे बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोप शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात करण्यात आला होता.

काँग्रेसच्या शिंदेंनी केलेल्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर हे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. ते म्हणाले, वाघमारे हे कोणतेही काम बेकायदेशीर करत नाहीत. त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला असून त्यांच्या माध्यमातून शहरात अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

सध्या मानकर यांचा पक्ष राज्यात सत्तेत असल्याने त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अभियंता प्रशांत वाघमारेंना बळ मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांची मागणी हवेतच राहू शकते.

वाघमारे यांच्याविरोधात काहीही कारवाई झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा 'दम'च मानकर यांनी आपल्या 'स्टाइल' मध्ये दिला आहे. तर वाघमारेंवरील आरोप शिंदेंनी कायम ठेवल्याने आगामी काळात शिंदे- मानकर वाद अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

Deepak Mankar, Prashant Waghmare, Arvind Shinde
Nana Patole : 'शरद पवारांचा 'तो' मेसेज मी उद्या खर्गे अन् राहुल गांधींना देणार' नाना पटोलेंचं वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com