Nana Patole : 'शरद पवारांचा 'तो' मेसेज मी उद्या खर्गे अन् राहुल गांधींना देणार' नाना पटोलेंचं वक्तव्य

Congress Pune Press : वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीत प्रवेशाबाबत स्पष्ट केली भूमिका...
Nana Patole : 'शरद पवारांचा 'तो' मेसेज मी उद्या खर्गे अन् राहुल गांधींना देणार' नाना पटोलेंचं वक्तव्य
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीसंदर्भात पुणे काँग्रेसची बुधवारी पुण्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषदेत विविध मुद्द्यांवर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत प्रवेशाबाबतही पटोलेंनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली.

नाना पटोले म्हणाले ''प्रकाश आंबेडकर शरद पवारांना (Sharad Pawar) भेटले, त्यानंतर 1 जानेवारीला शरद पवारांचा मला मेसेज आला. त्यांनी मला त्याबाबत सांगितले आणि आपण बसून चर्चा करू असं ते म्हणाले. त्यावर मी म्हणालो, की आपण मल्लिकार्जुन खर्गेंच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतच बसू. उद्धव ठाकरे, तुम्ही (शरद पवार) आणि प्रकाश आंबेडकरही असतील. त्यांनी ते मान्य केलं. शरद पवारांचा मेसेज मी उद्या दिल्लीत खर्गे आणि राहुल गांधींना देणार आहे. त्यानुसार बैठकीचं नियोजन केलं जाईल. आम्ही सकारात्मक आहोत. जे कोणी भाजपच्याविरोधात आमच्यासोबत यायला तयार असतील, त्यांना सोबत घेऊन चालणे ही काँग्रेसची भूमिका आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे गट) 23 जागा लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीच नुकतीच केली होती. यावर बोलताना पटोलेंनी, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 23 जागा लढणार हे सांगितले नाही. त्यामुळे बाकी कुणी काय बोलतं याला काही उपयोग नाही,' असं सांगत राऊतांना टोला लगावला.

याशिवाय महाविकास आघाडीचा लोकसभा फॉर्म्युला तयार आहे, आमच्यात कुठेही वाद नाही. आम्ही लवकरच निर्णय जाहीर करु. राज्यात महाविकास आघाडी 40 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावाही नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

Nana Patole : 'शरद पवारांचा 'तो' मेसेज मी उद्या खर्गे अन् राहुल गांधींना देणार' नाना पटोलेंचं वक्तव्य
Prakash Ambedkar: बिहारमध्ये काँग्रेसला 'वंचित' ठेवा; इंडिया आघाडीशी सूत जुळण्याआधीच आंबेडकरांनी डिवचलं

भाजपच्या ट्विटमध्ये प्रभू रामाला छोटे आणि मोदी यांना मोठे दाखवले जात आहे. नेमकं काय चाललं आहे, हे कळत नाही. देव मोठा का माणूस असा प्रश्न निर्माण होत आहे. खरंतर 22 तारखेला रामनवमी अथवा इतर कोणताही महत्त्वाचा दिवस नाही, केवळ आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राम मंदिराचा सोहळा भाजपने आयोजिला आहे, असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com