PMC Election 2025: 50 टक्के जागांचा तिढा सुटेना! मुख्यमंत्र्यांची बैठकही निष्फळ, उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी

Pune Municipal Election: CM Meeting 50% Seat Sharing: पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाणार होती. या बैठकीत उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केल्याने व आमदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने आज यादी जाहीर करण्याचे भाजपने टाळले आहे.
Pune Municipal Election: CM Meeting 50% Seat Sharing:
Pune Municipal Election: CM Meeting 50% Seat Sharing:Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीतही भाजपच्या नेत्यांमध्ये नावांवर एकमत होऊ शकलेले नाही.

पक्षातील जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नेत्यांच्या मर्जीतील लोकांनाच महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून द्यायचे आहे का?, पुण्यात बैठका घेताना संसदीय मंडळातील सदस्यांना बैठकांना बोलविण्यात आलेले नाही. कार्यक्षम नगरसेवक असूनही, सर्वेक्षणात नाव असूनही उमेदवारी का कापली जात आहे? असे प्रश्‍न विचारले गेले. त्यावरून लोकप्रतिनिधींमध्ये जोरदार चर्चा झाली. वादाचे मुद्दे व एकमत न झालेल्या नावांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर पुढे निर्णय घेऊन असे सांगून चर्चा पूर्ण केली.

पुण्यामध्ये भाजप उमेदवार ठरविण्‍यासाठी मतदारसंघनिहाय आमदार आणि माजी आमदारांसोबत चर्चा झाली होती. त्यानंतर गुरुवारी (ता. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून नावे अंतिम करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर आज (ता. २६) पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाणार होती. या बैठकीत उमेदवार निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केल्याने व आमदारांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने आज यादी जाहीर करण्याचे भाजपने टाळले आहे.

पक्षासाठी २०-३० वर्ष काम करणाऱ्या जुन्या लोकांना संधी द्या, शिवसेनेसोबतची युती, बाहेरच्या पक्षातून आलेले माजी नगरसेवक यामुळे आधीच जागा कमी झालेल्या असताना लोकप्रतिनिधींच्या नातेवाइकांना उमेदवारी द्यावी, त्यासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी गेल्या पाच वर्षात चांगले काम करणाऱ्या नगरसेवकांची उमेदवारी नाकारली जाणार होती. पण हा मुद्दा बैठकीत समोर आल्याने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. तसेच या बैठकीत आमदारांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या नसल्या तरी त्यांच्या काही जागांवर त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या बैठकीत सुमारे ८० ते ९० जागांचा तिढा सुटला आहे. उर्वरित जागेवर मुख्यमंत्री फडणवीस हे पदाधिकाऱ्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतील असे सूत्रांनी सांगितले.

Pune Municipal Election: CM Meeting 50% Seat Sharing:
Mahapalika Election: उमेदवार पैसे वाटताहेत? कुठे कराल तक्रार, जाणून घ्या

वादग्रस्त लोकांना उमेदवारी नको

काही उमेदवार महिला अत्याचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. तरीही त्यांना उमेदवारी दिली जाणार असेल तर मतदारांमध्ये पक्षाबद्दल नकारात्मक प्रचार होऊ शकतो. त्यामुळे अशा कलंकित लोकांना उमेदवारी देऊ नये. तेथे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत अशी मागणी महिला लोकप्रतिनिधींनी केली. त्यास अन्य आमदारांनीही पाठिंबा दिला आहे. पण त्यावर निर्णय झाला नाही. तसेच बुधवारी पुण्यात तारांकित हॉटेलमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदारांसोबत वैयक्तीक चर्चा झाली, तेथेही काही जणांची नावे उमेदवार म्हणून घेण्यात आली नाहीत. हे निरोप लगेच संबंधित लोकांना कसे पोचत होते, असा प्रश्‍न एका आमदारांनी उपस्थित केला.

यादी रविवारी दुपारी जाहीर होणार

‘‘भाजपने कोणालाही उमेदवारी अर्ज भरा असे निरोप दिलेले नाहीत. उमेदवार अंतिम करण्यासाठीची आमची प्रक्रिया अजून सुरु आहे. भाजप उमेदवारांची यादी रविवारी दुपारनंतर जाहीर होऊ शकेल.’’

- राजेश पांडे, महामंत्री, प्रदेश भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com