PMC Election: आलिशान गाड्यांच्या चर्चेत ‘माणुसकीची गाडी’ ठरतेय लक्षवेधी! पुण्यात उमेदवाराच्या नावावर केवळ रुग्णवाहिका

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे.
Bapu Mankar
Bapu Mankar
Published on
Updated on

PMC Election: आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक उमेदवारांच्या महागड्या गाड्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यात प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे आणि ते म्हणजे रुग्णवाहिका.

Bapu Mankar
ECI Terms: महापालिका निवडणुकीचा अर्ज भरताना आयोगाच्या अजब अटी! असा उमेदवार भारतात तरी कुठे सापडेल का?

उमेदवारी अर्जासोबत घोषित केल्यानुसार बाप्पु मानकर यांच्या नावावर कोणतीही आलिशान चारचाकी नसून, त्यांनी केवळ एक रुग्णवाहिका खरेदी केली आहे. त्यांच्या २४ तास सुरू असलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांच्या सेवेत ही रुग्णवाहिका कार्यरत असते. राघवेंद्र मानकर हे भाजपाच्यावतीने प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथून निवडणूक लढवत आहेत.

Bapu Mankar
Lok Sabha Election 2024 : भाजपवर नाराज असलेली मुस्लिम व्होट बँक ठाकरेंच्या पथ्यावर पडणार का? अशी आहे राजकीय समीकरणं

रुग्णवाहिकेसोबतच त्यांच्या नावावर एक दुचाकी वाहन आहे. दैनंदिन कामकाजासाठी ते प्रामुख्याने दुचाकीचाच वापर करतात. आलिशान गाड्या आणि ताफ्यांच्या राजकारणात हा साधेपणाचा दृष्टिकोन चर्चेचा विषय ठरत आहे.

Bapu Mankar
NCP Alliance: दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही आयडिया कोणाची? प्रस्ताव कोणी दिला? सुप्रिया सुळेंनी एका वाक्यात सांगितलं

याबाबत बोलताना बाप्पु मानकर म्हणाले, "गुढीपाडव्याला वाहन खरेदीची परंपरा आहे. २०२३ साली आम्ही रुग्णवाहिका खरेदी केली आणि तीच माझ्या मालकीची एकमेव चारचाकी आहे. रुग्णसेवेच्या कामासाठी तिची आवश्यकता होती. यापुढेही गुढीपाडव्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सेवेसाठीच वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. एक दुचाकी आहे, आणि शक्य तिथे त्यावरच फिरतो. त्यामुळे लोक भेटतात, प्रश्न समजतात. लांबच्या प्रवासासाठी मित्रांच्या वाहनांची मदत घेतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com