Pune Mahapalika News : माधव जगतापांना लाथ प्रकरण भोवले; अतिक्रमण विभागासाठी आता दोन उपायुक्त !

Pune Commissioner : गोंधळाच्या स्थितीत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वय गरजेचा
PMC
PMC Sarkarnama

PMC News : पुणे महापालिकेतील अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी कारवाई करताना खाद्य पदार्थाच्या स्टॉलला लाथ मारली होती. त्यामुळे ते वादात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राजकीय पक्ष, संघटनांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जगताप यांच्या अधिकारांवर मर्यादा आणल्या आहेत. आता अतिक्रमण विभागाची जबाबदारी दोन उपायुक्तांकडे असणार आहे.

महापालिकेच्या (PMC) अतिक्रमण विभागाची जबाबदारी एकाच उपायुक्ताकडे होती. त्यानुसार माधव जगताप हे अनेक वर्षांपासून या विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान, अतिक्रमण कारवाई करताना जगताप यांनी एका स्टॉलला लाथ मारली होती. त्याचा 'व्हिडिओ' समाजमाध्यमात 'व्हायरल' झाला. याप्रकरणी जगताप यांना कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे. दरम्यान, राजकीय पक्षांसह विविध संघटनांकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाढली होती. त्यातच आता आयुक्तांनी हे प्रशासकीय बदल केले आहेत. या बदलातून जगताप यांचे अधिकार छाटण्यात आले आहेत.

PMC
Transfer of police officers : कोल्हापूरचे 'एसपी' शैलेश बलकवडेंना साईड पोस्टिंग; त्यांच्या जागी महेंद्र पंडितांची नियुक्ती

आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी काढलेल्या आदेशानुसार आता अतिक्रमण विभगात दोन उपायुक्त असणार आहेत. महापालिकेत राजू नंदकर हे नवे अधिकारी उपायुक्त म्हणून रुजू झाले आहेत. त्यांना परिमंडळ एक व दोनची अतिक्रमण विभागाची जबाबदारी दिली आहे. तर माधव जगताप यांच्याकडे आता तीन, चार व पाच परिमंडळाची जबाबदारी असणार आहे. हे बदल करताना आयुक्तांनी जगताप यांच्याकडील आकाशचिन्ह, सुरक्षा या दोन्ही विभागाची जबाबदारी कायम ठेवली आहे.

PMC
Khed APMC News : आमदार मोहिते विरोधकांचा एक होण्याचा आणखी एक प्रयत्न खेड बाजार समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत फसला

आयुक्तांनी महेश डोईफोडे यांच्याकडील मोटर वाहनची विभागाची जबाबदारी काढली आहे. त्याऐवजी त्यांना पर्यावरण, मंडई, बीओटी सेल व तांत्रिक विभाग ही जबाबदारी दिली. आता नंदकर यांच्याकडे अतिक्रमणसह मोटर वाहन विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, प्रशिक्षण प्रबोधिनीची जबाबदारीही असणार आहे. तर महेश पाटील यांच्याकडे पूर्वी दक्षता व आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी होती. त्यात आता मालमत्ता व्यवस्थापन विभागाची भर पडली आहे. (Pune News)

PMC
UPSC Result 2023 : बारामतीला मिळाला पहिला 'आयएएस' अधिकारी; प्रतिक जराडची उत्तुंग भरारी

पूर्वी जगताप यांच्याकडे अतिक्रमण विभागाची संपूर्ण जबाबदारी होती. त्यामुळे उपायुक्त म्हणून त्यांनी निर्णय घेतल्यानंतर सर्व शहराला लागू होत होता. आता मात्र दोन उपायुक्त आहेत. त्यामुळे कारवाईचे नियोजन, धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी यात दोघांमध्ये समन्वय असणे आवश्‍यक आहे. अन्यथा आधीच गोंधळाची स्थिती असताना त्यात आणखीन भर पडून नागरिकांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com