PMC News : नगरसचिवांशिवाय कारभाराचा 'विक्रम'; आयुक्तांच्या 'पारखी' नजरेला झालंय काय?

Municipal Secretary : नगरसचिव या महत्वाच्या पदासाठी मागील साडेतीन वर्षांपासून सक्षम अधिकारी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
PMC Commissioner Vikram Kumar
PMC Commissioner Vikram KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई पाठोपाठ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर अशी ओळख पुणे शहराची आहे. विद्येचे माहेरघर, आयटी हब अशी ख्याती असलेल्या पुणे शहराच्या महापालिकेचे बजेट तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र याच महापालिकेला गेल्या साडेतीन वर्षात नगरसचिव पदावर सक्षम अधिकारी मिळाला नाही. गेल्या साडेतीन वर्षापासून या पदाची प्रभारी जबाबदारी दुसऱ्याच अधिकाऱ्यांवर टाकून पालिकेचा कारभार सुरू आहे. (PMC News)

महापालिकेच्या कारभारात पालिका आयुक्त, आरोग्य प्रमुख यासह नगर सचिव हे पद अत्यंत महत्त्वाचं मानले जाते. महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यामधील दुवा म्हणून नगरसचिव विभाग काम करत असतो. महापालिकेतील स्थायी, महिला बालकल्याण शहर सुधारणा विधी, अशा विविध समित्यांचे प्रस्ताव मांडून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव करून घेणे, अशी कामे नगरसचिव यांच्या मार्फत केली जातात. राज्य सरकारकडून आलेला पत्रव्यवहार महत्त्वाच्या गोष्टी या नगरसचिव यांच्या मार्फतच पुढे येत असतात. तसेच एखाद्या प्रस्तावावर अथवा ठरावावर काही अडचणी वाद निर्माण झाल्यास त्यासाठी देखील नगरसचिव यांनाच जबाबदार धरले जाते. (Pune Latest News)

PMC Commissioner Vikram Kumar
Yuva Sena News': श्रीकांत शिंदेंनी झटक्यात न्याय केला; गुंड दाभेकरच्या ‘हजेरी’ची अनिकेतला शिक्षा...

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका म्हणून पुणे महापालिकेचा उल्लेख होतो. पुणे शहराचा गेल्या काही वर्षात झालेला विस्तार पाहता शहराचे बजेट देखील वाढले आहे. सध्या पुणे महापालिकेचे बजेट साडेनऊ हजार कोटी रुपयांच्यावर पोहचले आहे. मात्र याच महापालिकेला गेल्या साडेतीन वर्षापासून पूर्णवेळ नगरसचिव मिळत नसल्याचे समोर आले आहे. सध्या नगरसचिवपदाचा अतिरिक्त पदभार राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफिसर) योगिता भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे महापालिकेचे नगरसचिव म्हणून जबाबदारी पार पाडणारे अधिकारी सुनील पारखी (Sunil Parkhi) हे गेले अनेक वर्ष 'नगरसचिव' होते. ऑगस्ट 2020 मध्ये पारखी हे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आजपर्यंत हे पद रिक्त आहे. पारखी यांच्या निवृत्तीनंतर मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. गेल्या वर्षी म्हणजे मे 2023 मध्ये दौंडकर वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यानंतर देखील पालिकेच्या नगरसचिव पदावर पूर्णवेळ कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही.

PMC Commissioner Vikram Kumar
Ambadas Danve On Eknath Shinde : निवडणुकीच्या वेळी गुंडांना तुरुंगातून सोडलं, दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

साडेतीन वर्षांपूर्वी नगरसचिव पदावर काम करणारे पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर पालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी नगरसचिव पदासाठी भरती प्रक्रिया राबविली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी या पदासाठी 25 जणांनी अर्ज केले. पण आयुक्तांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या पदासाठी एकही 'सक्षम' उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ही जागा अद्यापही रिक्तच राहिली आहे.

महापालिकेमध्ये नगरसेवक अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीचे पद मानले जात असताना गेल्या साडेतीन वर्षांमध्ये त्यासाठी एकही सक्षम अधिकारी प्रशासनाला मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे तर पालिकेच्या अधिकाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारकडील अधिकारीदेखील या पदासाठी लायक नसल्याचे आयुक्तांना वाटत असावे, त्यामुळेच हे पद भरले जात नसावे, असे पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

PMC Commissioner Vikram Kumar
Pune Congress : काँग्रेस भवनात हमरीतुमरी, शिवीगाळ अन्...; चौघांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com