Pune Congress : काँग्रेस भवनात हमरीतुमरी, शिवीगाळ अन्...; चौघांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Pune Congress : युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोर नेत्यांमध्ये वाद झाला होता.
Pune Congress
Pune CongressSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या ( Loksabha ELection 2024 ) पार्श्वभूमीवर पक्ष मजबूतीसाठी काँग्रेसची ( Congress ) नेतेमंडळी झटताना दिसत आहेत. पण, दुसरीकडे काँग्रेसचे युवक नेते आपापसांत भिडताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातील काँग्रेस भवन येथे युवकच्या नेत्यांत शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) तुफान राडा झाला. यावेळी दोन गटानं एकमेकांना शिवीगाळ करत हमरीतुमरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी आता चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Congress
MP Shriniwas Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी; खासदार श्रीनिवास पाटील बॅनरवरून गायब

प्रफुल्ल संभाजी पिसाळ (वय 26, रा. पौड रस्ता) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अमिर शेख (वय 35), भूषण रानभरे (वय 30), युवराज नायडू (वय 35) आणि राज जाधव (वय 28) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

काँग्रेस भवनात नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस भवनात शनिवारी ( 3 फेब्रुवारी ) पदाधिकारी नियुक्ती पार पडली. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून पिसाळ आणि अन्य चार कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर चौघांनी पिसाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली.

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोर हा प्रकार घडला. याप्रकारानंतर पिसाळ यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तक्रार दिली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Congress
Yuva Sena News': श्रीकांत शिंदेंनी झटक्यात न्याय केला; गुंड दाभेकरच्या ‘हजेरी’ची अनिकेतला शिक्षा...

लोकसभा निवडणूक जवळ येईल, तसं काही मित्रपक्षांनी काँग्रेसची साथ सोडली. त्यातच काँग्रेस अंतर्गतही दुही असल्याचं लपून राहिलेलं नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातही काही अलबेल नसल्याचं वारंवार समोर आलं आहे. आता, तर काँग्रेसमधील युवानेत्यांचे दोन गट भिडल्यानं पक्षातील ज्येष्ठ मंडळीही हतबल झाल्याची चर्चा आहे.

नाना पटोलेंना युवक काँग्रेसचा घेराव

दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात पश्चिम महाराष्ट्राच्या बैठकीसाठी आले होते. पटोलेंनी काही स्थानिक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. या नेत्यांच्या भेटीगाठीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य रंगलं होतं. जो नेता राजकीय पटलावर सक्रिय नाही, अशा नेत्यांच्या भेट का घेतल्या? अस सवाल उपस्थित करत युवक काँग्रेकनं नाना पटोलेंना घेराव घातला होता.

Edited By : Akshay Sabale

Pune Congress
Ambadas Danve On Eknath Shinde : निवडणुकीच्या वेळी गुंडांना तुरुंगातून सोडलं, दानवेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com