Vanraj Andekar : ...अन् वनराज आंदेकर यांचा 'असा' झाला गेम; आरोपी अन् पाणीपुरी कनेक्शन आलं समोर

Vanraj Andekar Case : वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट कोणी रचला? कोणी पाळत ठेवली होती? हे पोलिस तपासात निदर्शनास आलं आहे.
vanraj andekar | shivam andekar
vanraj andekar | shivam andekar sarkarnama
Published on
Updated on

माजी नगरसेवक वनराज आंदोकर खून प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजवणाऱ्या आरोपी विवेक कदम आणि दीपक तोमकर यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी कदम आणि तोमकरने नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी वनराज आंदेकर यांच्यावर पाळत ठेवण्याचं काम केलं होतं, अशी माहिती पोलिस तपासात निदर्शनास आली आहे.

1 सप्टेंबरला वनराज आंदेकर यांचा कोयत्यानं वार करत गोळ्या झाडून खून केला होता. मात्र, वनराज आंदेकर यांचा 'गेम' करण्यासाठी पाळत कशी ठेवण्यात आली? कुणी ठेवली? कसा आणि कुणी कट रचला? खूनाच्या दिवशी नेमकं काय घडलं होते? याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ उर्फ सोम्या गायकवाड आहे. निखील आखाडे याचा खून झाला होता. याचा बदला घेण्यासाठी सोम्या गायकवाडनं साथीदारांची जमवाजमव केली होती. यातच वनराज आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून कोमकर यांनी गायकवाड याच्याशी संपर्क साधला होता. सोम्या गायकवाड, अनिकेत दुधभाते, कोमकर, प्रसाद बेल्हेकर यांनी नवराज यांचा खून करण्याचा कट रचला.

vanraj andekar | shivam andekar
Vanraj Andekar Shot : सहा गाड्यांवरून हल्लेखोर आले अन्...; वनराज आंदेकरांच्या खूनाचा थरकाप उडविणारा CCTV व्हिडिओ समोर

आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर हे सोम्या गायकवाडसाठी काम करत होते. वनराज यांचा खून करण्यापूर्वी आरोपींनी नियोजन केलं होतं. 1 सप्टेंबरला वनराज आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम आंदेकर हे नाना पेठेतील डोके तालीम परिसरात असलेल्या उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत थांबले होते.

तेव्हा, दूधभाते आणि त्याच्या साथीदारांनी वनराज यांच्यावर कोयत्यानं वार करून गोळ्या झाडल्या. त्यापूर्वी आरोपी तोमरकर आणि विवेक कदमने नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी आंदेकर यांच्या पाळत ठेवली होती. वनराज हे सतत कार्यकर्त्यांसोबत असल्याचं आरोपींना माहिती होतं.

vanraj andekar | shivam andekar
Vanraj Andekar : वनराज आंदेकरांचा गेम करणारा मास्टरमाईंड कोण? कधीपासून शिजत होता कट?

तोमकर आणि कदम यांनी चौकातील एका पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. वनराज आणि भाऊ शिवम आंदेकर हे गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते नव्हते. तोमकर आणि कदम यांनी संधी साधली आणि सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळात आंदेकर यांच्यावर सहा गाड्यांवरून आलेल्या तेरा जणांनी कोयताने वार करत गोळीबार केला. यात आंदेकर यांचा रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com