निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! नगरसेवकालाच लाच प्रकरणात अटक

लाच घेतल्याप्रकरणी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना अटक झाली आहे.
Keshav Gholve
Keshav GholveSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : लाचखोरी प्रकरणात गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) स्थायी समितीचे अध्यक्ष सत्ताधारी भाजपचे (BJP) अॅड नितीन लांडगे यांना अटक झाली होती. आता लाच घेतल्याप्रकरणी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक केशव घोळवे (Keshav Gholve) यांना अटक झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकाराने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

सहा महिन्यांपूर्वी स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे हे लाच घेताना सापडले होते. आता घोळवे हे लाच प्रकरणात अडकले आहेत. या प्रकरणाचा पडद्यामागील सूत्रधार देखील बडा राजकीय पदाधिकारी आहे. कपडा मार्केटमधील तीन जणांनी या प्रकरणी तक्रार केली होती. या तक्रार अर्जावरून एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून घोळवे यांचे नाव समोर आल्याने त्यांना अटक केल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले. घोळवे यांची मूळ ओळख कामगार नेते अशी आहे. महापालिकेच्या मागील निवडणुकीत मोरवाडी-संभाजीनगर प्रभागातून ते निवडून आले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे निष्ठावंत आहेत. (Keshav Gholve arrested)

Keshav Gholve
समीर वानखेडेंना दणका देणारे निघाले संजय राऊतांचे व्याही!

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे व इतर तीन कर्मचाऱ्यांवर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सहा महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्यावेळी लांडगे यांच्या बचावासाठी शहरातील भाजपचे दोन्ही कारभारी आमदार असलेले भोसरीचे महेश लांडगे (Mahesh Landge) व चिंचवडचे लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) धावून आले होते. यामागे खूप मोठा राजकीय हस्तक्षेप आणि षडयंत्र असून अॅड. लांडगे यांना नाहक गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केला होता.

Keshav Gholve
'ईडी'च्या सहसंचालकांची 'व्हीआरएस' अन् 24 तासांतच भाजपकडून लॉटरी

दरम्यान, नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि लिपिक विजय चावरिया यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान हजेरी, तसेच फिर्यादी आणि गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येण्याच्या अटीवर व तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com