समीर वानखेडेंना दणका देणारे निघाले संजय राऊतांचे व्याही!

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी समीर वानखेडेंना दणका दिला आहे.
Sanjay Raut-Rajesh Narjevkar
Sanjay Raut-Rajesh NarjevkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) दणका दिला आहे. मुंबईत वानखेडे यांचा एक रेस्ट्रो बार आहे. वानखेडे यांनी 17 वर्षांचे असताना या बारचा परवाना घेतला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार ठाण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी वानखेडेंचा बारचा परवाना रद्द केला आहे.ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) हे आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे व्याही आहेत.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा विवाह नार्वेकर यांचा मुलगा मल्हार याच्यासोबत झाला होता. या विवाहाची खूप चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता योगायोगाने वानखेडेंवर कारवाई करण्याची जबाबदारीही नार्वेकर यांच्यावर आली. वानखेडे यांनी सतराव्या वर्षी बार परवाना घेतल्याने या बारला जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वानखेडे यांनी 1997 मध्ये बारचा परवाना घेताना खोटी कागदपत्रे सादर केल्याचे या नोटिशीत म्हटले होते. अखेर वानखेडे यांनी वयाची पात्रता नसताना परवाना घेतल्याने जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी तो रद्द केला आहे.

Sanjay Raut-Rajesh Narjevkar
'ईडी'च्या सहसंचालकांची 'व्हीआरएस' अन् 24 तासांतच भाजपकडून लॉटरी

वानखेडे यांनी पात्र नसतानाही बारचा परवाना घेतल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समोर आणले होते. ते म्हणाले होते की, कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल.

Sanjay Raut-Rajesh Narjevkar
वानखेडेंमुळे मलिक अडचणीत; अॅट्रोसिटी दाखल करण्याचा मुंबई पोलिसांना आदेश

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रेस्ट्रो बार आहे. समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये सद्गुरू रेस्ट्रो बार सुरू करण्यात आला. त्याचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांच्या नावाने घेण्यात आला. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखेडे यांच्या नावावर आहे. बारचा परवाना मिळवण्यासाठी वयाची अट 21 वर्षे आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडे हे नेमके कसे घडले याविषयी विचारणा केली होती. उत्पादन शुल्क विभागाची प्राथमिक चौकशी संपल्यानंतर या प्रकरणी ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com