लाच घेताना रंगेहाथ पकडलं अन् बर्थ डे सेलिब्रेशनऐवजी हाती पडल्या बेड्या!

पोलिस अधिकाऱ्यासह एका मान्यवर वकीलाचा यात सहभाग असल्याने या घटनेची जुन्नर तालुक्यात मोठी चर्चा आहे.
accepting bribe
accepting bribeSarkarnama
Published on
Updated on

जुन्नर (जि. पुणे) : जुन्नर (Junnar) पोलिस (Police) ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाला वाढदिनीच एका वकीलासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. यातील पोलिस अधिकारी अमोल साहेबराव पाटील यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. (Police sub-inspector caught red-handed while accepting bribe)

अमोल पाटील आणि त्यांच्या वतीने लाचेची (bribe) मागणी करणारे वकील केतनकुमार अशोक पडवळ यांच्या विरुद्ध एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यासह एका मान्यवर वकीलाचा यात सहभाग असल्याने या घटनेची जुन्नर तालुक्यात मोठी चर्चा आहे.

accepting bribe
पृथ्वीराज जाचकांची ऑफर घोलप कुटुंबीय स्वीकारणार काय?

जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराने ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी सुरुवातीला २५ हजार रुपये आणि १५ नोहेंबरला उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील व त्यांच्या वतीने वकील केतन पडवळ यांनी लाचेची मागणी केली, तसेच लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केला असे तक्रारदाराने फिर्यादीत नमूद केले आहे.

accepting bribe
नितीशकुमार सरकारमधील मंत्र्याची अवघ्या दीड महिन्यात पडली विकेट!

पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्योती पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्नर येथे शनिवारी (ता. १ ऑक्टोबर) ही कारवाई केली.

accepting bribe
...तर विक्रम काळे उस्मानाबादचे आमदार झाले असते : अजित पवारांनी सांगितला तिकिटाचा किस्सा!

याबाबतची माहिती अशी की तक्रारदाराविरुद्ध वर्षाभरापूर्वी जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. यातील त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तो पुन्हा जुन्नर पोलिसांकडे आला होता. तत्कालीन तपास अधिकाऱ्यांची बदली झाल्याने हा गुन्हा तपासकामी अमोल पाटील यांच्याकडे आला होता.

त्यांनी तक्रारदाराला मी फिर्यादीचा जबाब घेतला आहे. या गुन्ह्यात अनेक वाढीव कलमांचा समावेश होऊ शकतो. तो न होण्यासाठी मला एक लाख रुपये त्वरीत द्या, अशी वारंवार मागणी केली. तसेच, त्यांच्या वतीने ॲड केतनकुमार पडवळ यांनी तक्रारदारांना फोन करून मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे शनिवारी तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी आले असता सापळा लावण्यात आला होता. लाचलुचपत विभागाने तक्रारदारकडे व्हाईस रेकॉर्डरखील दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com