पृथ्वीराज जाचकांची ऑफर घोलप कुटुंबीय स्वीकारणार काय?

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या गटाची सत्ता आहे.
Prithviraj Jachak-AvinashGholap
Prithviraj Jachak-AvinashGholapSarkarnama
Published on
Updated on

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर (Indapur) तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या (sugar Factory) आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांनी माजी अध्यक्ष अविनाश घोलप (AvinashGholap) यांना युती करण्याची ऑफर दिली आहे. सत्तेपासून दूर असलेले घोलप कुटुंबीय हे ऑफर स्वीकारणार याकडे इंदापूर-बारामतीचे लक्ष लागले आहे. (Prithviraj Jachak's offer to Gholap Family for alliance in Chhatrapati sugar Factory elections)

श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत एप्रिल २०२० संपली आहे. काेरोना महामारी व न्यायालयीन प्रक्रियेमुळे विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली आहे. मात्र आगामी काळात छत्रपती कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्र हे इंदापूर आणि बारामती तालुक्यात आहे. दोन्ही तालुक्याच्या सीमेवर असणारा हा कारखाना दोन्ही तालुक्यातील विशेषतः इंदापूरच्या राजकारणातील महत्वाचा भाग आहे.

Prithviraj Jachak-AvinashGholap
नितीशकुमार सरकारमधील मंत्र्याची अवघ्या दीड महिन्यात पडली विकेट!

कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांचे वडील (स्व.) साहेबराव नामदेवराव जाचक हे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते, तर माजी अध्यक्ष अविनाश घोलप आणि अमरसिंह घोलप यांचे वडिल (स्व.) राजेंद्रकुमार बाबूराव घोलप यांनीही सुमारे १० वर्ष कारखान्याचे अध्यक्ष म्हणून सक्षमपणे कारभार पाहिला होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्राममध्ये जाचक व घोलप कुटुंबीयांना मानणारा सभासद वर्गही मोठ्या प्रमाणात आहे.

Prithviraj Jachak-AvinashGholap
...तर विक्रम काळे उस्मानाबादचे आमदार झाले असते : अजित पवारांनी सांगितला तिकिटाचा किस्सा!

सध्या कारखान्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या गटाची सत्ता आहे. कारखान्याची ६४ वी वार्षिक साधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पृथ्वीराज जाचक यांनी जाहीरपणे दादांनी (अविनाश घोलप) यांनी मागील निवडणुकीत साथ दिली असती तर वेगळे चित्र दिसले असते. त्यामुळे पुढील निवडणुकीत दादांनी साथ दिल्यास टाळीच (विजयी होऊ) करू, असे म्हणून जाचकांनी अप्रत्यक्षरित्या घोलपांना युतीची ऑफर दिली आहे.

Prithviraj Jachak-AvinashGholap
...अन्‌ अजितदादांनी अचानकपणे सोलापुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला!

जाचक हे गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पॅनेल उभे करीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप यश मिळलेले नाही. कारखान्याच्या २०१५ च्या निवडणुकीत जाचक- घोलप युती होणार होती. मात्र, काही कारणांमुळे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही, अशी चर्चा आजही कारखान्याच्या कार्यक्षेत्रात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com