Pimpri-Chinchwad Police: खासदार कोल्हेंना धमकी देणाऱ्या पोलिसाला आयुक्तांनी पाठवले घरी

Pimpri-Chinchwad Police : शिवपुत्र संभाजी महानाट्याचा पास फुकट मागणे पोलिसाला भोवले
Pimpri-Chinchwad Police
Pimpri-Chinchwad PoliceSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु आहेत. त्याला गालबोट लावणारी घटना परवा (ता.१३) घडली. या महानाट्याचे मोफत पास दिले नाहीत म्हणून एका पोलिसाने थेट खासदार कोल्हेंनाच धमकावले होते.

या गंभीर प्रकाराची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आय़ुक्त विनयकुमार चौबे यांनी तातडीने दखल घेत या पोलिसाला निलंबित केले आहे. महेश नाळे असे त्याचे नाव असून तो पिंपरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर केली होती.

Pimpri-Chinchwad Police
Pune News: "'मविआ' सरकार घालवण्यासाठी घरी बसायलाही तयार होतो; पण पक्षाने मला सन्मानित करून उपमुख्यमंत्री केलं"

राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य दखल घेऊन संबंधित पोलीसाला समज द्यावी, असे खासदार कोल्हेंनी म्हटले होते. त्यामुळे सबंधित पोलिसांवर गृहमंत्र्यांअगोदरच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हेच कारवाई करण्याची शक्यता आहे, असे वृत्त 'सरकारनामा'ने कालच (ता.१४)दिले होते. ते लगेच खरे ठरले.

पोलीस आयुक्तांनी काल नाळेला निलंबित केले. कारण फडणवीस हे आज पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजनासाठी आज शहरात येणार होते. या महानाट्याच्या प्रयोगाचे मोफत पास दिले नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो तेच पाहतो अशी धमकी नाळेने खासदार कोल्हेंना दिली होती.

Pimpri-Chinchwad Police
BJP News : कर्नाटक हातचे जाताच भाजपा हादरला; पक्षसंघटनेत हे बदल तातडीने होणार; शिंदे गटाचे वजन वाढणार...

त्यामुळे उद्वि्ग्न झालेल्या खासदार कोल्हेंनी प्रयोगादरम्यानच त्याची माहिती स्टेजवर येऊन दिल्याने त्याचा प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. मात्र, धमकी दिलेल्या पोलिसाचे नाव त्यांनी सांगितले नव्हते.

या महानाट्याच्या याअगोदर झालेल्या प्रयोगाला पोलीस तिकीट काढून आल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली होती. त्यांच्या सहकार्याचाही उल्लेख केला होता. नागरिक जो कर भरतात त्यातून पोलिसांचा पगार होतो. असे असताना छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी भीख मागता हे पोलिसांच्या उज्वल परंपरेला गालबोट लावणारे आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com