Pooja Khedkar : 'यूपीएससी'ने रद्द केलेल्या नियुक्तीविरोधात पूजा खेडकर यांची हायकोर्टात धाव

IAS Officer Pooja Khedkar Update : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे.
Pooja Khedkar
Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 August : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांची चर्चा महाराष्ट्रभर झाली. प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांचा शाही थाट समोर आल्यानंतर त्यांच्याबाबतचे रोज नवनवे खुलासे समोर आले.

UPSC परीक्षा देताना सादर केलेलं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र तसेच अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात आलं. या सर्व प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. यानंतर यूपीएससीने मोठा निर्णय घेत त्यांचं आयएएस पद तात्पुरते रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाच्या विरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती झालेल्या 'प्रोबेशन' कालावधीत महिला IAS अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसवून, आपल्या 'व्हीआयपी' नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला त्यांनी अंबर दिवा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

पूजा खेडकर एवढ्यावर थांबल्या नाहीत तर एका अधिकाऱ्याच्या 'अ‍ॅण्टी चेंबर'मध्ये आपले आलिशान कार्यालय थाटले, तिथे आपल्या नावाची पाटीदेखील लावली. त्यामुळे जिल्हाधिकारी इमारतीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा त्यांचाच रुबाब भारी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर पुण्यातील (Pune) रुबाबात चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकरांची राज्य सरकारने थेट वाशिमला बदली केली.

Pooja Khedkar
Sheikh Hasina Resigns : मोठी बातमी! शेख हसीना भारतात दाखल, पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा

आयएएसपदी निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना दोन वर्षे शिकण्यासाठी विविध पदावर सहा महिन्यांसाठी प्रोबेशनरी पदांवर नियुक्ती केली जाते. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी वाहन सुविधा अथवा त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात येत नाही. असे असताना देखील या अधिकाऱ्यांनी एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अ‍ॅण्टी चेंबर स्वतःचे कार्यालय म्हणून सुरू केले होते. तसेच त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची पाटी ही लावली होती.

दरम्यान, पूजा खेडकर यांच्याबाबतचे अनेक कारणाने समोर आले. खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी आयएएस हे पद मिळाल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. या आरोपांची दखल 'UPSC'ने घेतली आणि खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Pooja Khedkar
Fadnavis Vs Deshmukh: Video फडणवीसांनी देशमुखांचा विषय एका वाक्यातच संपवला; म्हणाले, ‘झूट बोले कौवा काटे'...

आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 च्या माध्यमातून तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची उमेदवारी तात्पुरती रद्द केली आहे. शिवाय त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे बाद करण्यात आले आहे.

यानंतर आता पुजा खेडकर यांनी 'यूपीएससी'ने तीची उमेदवारी रद्द केल्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये, UPSC, DOPT मसुरी इथले प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी बनविण्यात आलं आहे. ही याचिका पुजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने आहे. मात्र, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे पूजा दिलीपराव खेडकर या नावाने आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com