Dombivli, 28 May: पावसाळा सुरु होण्यापूर्वी नालेसफाईचा विषय नेहमीच चर्चेला येतो. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने पाणी साचून नागरिकांना घाणीचा व दुर्गंधीचा सामना करावा लागतो, हे टाळण्यासाठी प्रशासनाकडून Thane Municipal Corporation नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला जातो. दिव्यात नाले सफाईच काम सुरू झालं नसल्याने पावसाळ्यात हाल होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दिव्यातील नाले सफाईची पाहणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील MLA Raju Patil यांनी केली. त्यांना झालेल्या कामाची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित दिली नाही, आपल्याला माहित नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राजू पाटील यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले झापले. यावेळी सफाई योग्य पद्धतीने झाली नसल्याचे आमदार पाटील यांच्या लक्षात आले. त्यांना अधिकाऱ्यांना त्याविषयी नीट माहिती दिली नाही, त्यामुळे आमदार पाटलांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
दिवा शिळं रोड,साबे गाव, मुंब्रा कॉलनी, दिवा स्थानक परिसरातील नाल्यांच्या परिस्थितीचा आढावा आमदार पाटलांनी घेतली आहे. यावेळी ठाणे मनपाला अद्याप नाले सफाईला मुहूर्त मिळाला नसल्याने आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांचे ठिकठिकाणी खच पडलेले आहेत. दिव्यातील नाले सफाई संदर्भात लवकरच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे. सहा तारखेच्या आत नालेसफाई झाली नाही तर याद राखा,असा सज्जड दम आमदारांनी अधिकाऱ्यांना भरला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिव्यात बहुसंख्य ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. दिव्यातील न झालेल्या नाले सफाईमुळे पावसाळ्यात दिवा तुंबण्याची भीती अधिक असल्याने लवकरच आयुक्तांची भेट घेऊन दिवेकरांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे. यावेळी दिवा मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मनपाकडून नाले सफाईकडे दुर्लक्ष केला जात असल्याने नागरिकांनी स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे देखील दिसून आलं आहे. मात्र पावसाळा जवळ आला असताना ठाणे मनपा दिव्यातील नाले सफाईसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांसोबत दिव्यातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.